Talegaon Dabhade : ॲड पु. वा. परांजपे विद्यामंदिर तालुक्यात अव्वल

एमपीसी न्यूज – विद्यार्थी गुणवत्तेच्या आधारे शाळा मूल्यांकन (Talegaon Dabhade) व स्तर निश्चिती सन 2022 -23 ची अंतिम यादी जिल्हा परिषदेने जाहीर केली आहे. यामध्ये तळेगाव दाभाडे येथील ॲड पु. वा. परांजपे विद्यामंदिर ही शाळा तालुक्यात पहिल्या स्थानावर आहे. तर जिल्हा स्तरावर शाळेचा 102 क्रमांक आहे.

विद्यार्थी गुणवत्तेच्या आधारे शाळा मूल्यांकन व (Talegaon Dabhade )स्तर निश्चिती सन 2022 -23 च्या अंतिम यादी नुसार पुणे जिल्हा परिषदे कडून जिल्हा गुणवत्ता निश्चिती मूल्यांकनामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ॲड् पु वा परांजपे विद्या मंदिर जिल्ह्याच्या 102 क्रमांकावर तर मावळ तालुक्यामध्ये सर्व शाळांमधून प्रथम क्रमांकावर गुणवत्ता मूल्यांकन यादी मध्ये स्थान मिळवले आहे.

Pune : नीलाद्री कुमार यांच्या सुरबहार, सतार आणि झितार सादरीकरणात पुणेकर गुंग

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,माजी राज्यमंत्री संजय (बाळा)भेगडे,उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव व शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार,खजिनदार राजेश म्हस्के व संस्थेतील सर्व सदस्यांनी ॲड् पु.वा.परांजपे विद्यालयाच्या शाळेचे कार्य कुशल मुख्याध्यापक पांडुरंग पोटे,पर्यवेक्षिका कमल ढमढेरे व सर्व शिक्षक- शिक्षकेतर वृंद यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.