Talegaon Dabhade : नाट्यपरिषद आणि श्रीरंग कलानिकेतनतर्फे येत्या रविवारी गुरुपौर्णिमा महोत्सव

गानतपस्वी कै.पं.शरदराव जोशी यांच्या संगीत कारकीर्दीवर 'मागोवा स्वर पर्वाचा'चे आयोजन

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखा आणि श्रीरंग कलानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव येत्या रविवारी (दि.२१ जुलै) सायंकाळी पाच वाजता श्रीरंग कलानिकेतनच्या वनश्रीनगर, चाकण रोड, तळेगाव दाभाडे येथील सभागृहात संपन्न होणार आहे. या गुरुपौर्णिमा महोत्सवात तळेगावचे महागुरू, गानतपस्वी कै.पं.शरदराव जोशी यांच्या संगीत क्षेत्रातील कारकीर्दीवर आधारित “मागोवा स्वर पर्वाचा” हा आगळा वेगळा कार्यक्रम होणार आहे.

गुरुपौर्णिमा उत्सव म्हणजे आपल्या कलेच्या माध्यमातून गुरूंना अर्पण केलेली भाव सुमनांजली असते. या कार्यक्रमाची संकल्पना तळेगावच्या संगीत अभ्यासक संपदा थिटे आणि नृत्य अभ्यासिका मीनल कुलकर्णी यांची आहे. यात कै.पं.शरदराव जोशी यांच्या संगीत रचना, त्यांनी लिहिलेल्या नाटकातील काही प्रवेश, त्यांनी साकारलेल्या संगीत नाटकातील भूमिका, त्यांनी स्वरबद्ध केलेली अनेक बालगीते, भजन, नाट्यगीते यांचा मागोवा घेण्यात चा येणार असून, यात ४० हून अधिक कलाकारांचा सहभाग असलेला कला अविष्कार रंगमंचावर सादर होणार आहे.

  • तळेगाव दाभाडेमधील कलाकारांच्या या अनोख्या सादरीकरणाचा आनंद घेण्यासाठी तळेगावकर रसिक, तसेच कै.पं. शरदराव जोशी यांच्या चाहत्यांनी आणि त्यांच्या शिष्यवर्गाने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीरंग कलानिकेतनच्या अध्यक्षा डॉ. नेहा कुलकर्णी, प्रमुख विश्वस्त निरूपा कानिटकर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशराव धोत्रे व विश्वस्त सुरेश साखवळकर यांनी केले आहे.
    • गानतपस्वी कै.पं.शरदराव जोशी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.