Pimpri : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या अध्यक्षपदी जिग्नेश अगरवाल यांची निवड

एमपीसी न्यूज  – रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या अध्यक्षपदी रो. जिग्नेश अगरवाल यांची निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून रो.  शशिकांत शर्मा यांच्याकडे पदभार देण्यात आला. मावळते अध्यक्ष गणेश जामगांवकर यांनी अध्यक्षपदाची  सूत्रे जिग्नेश अगरवाल यांच्याकडे सोपवली.

रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचा पदग्रहण समारंभ चिंचवड येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट 3131 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. रवी धोत्रे उपस्थित होते.  यावेळी रोटरी क्लब ऑफ आकुर्डीची 2019-20या आगामी वर्षाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

नवीन कार्यकारणीमध्ये शशिकांत शर्मा (सचिव), गणेश जामगावकर (आयपीपी), पुष्पा पमनानी (नियोजित अध्यक्ष), सचिन पारेख (खजिनदार), पुष्पा पमनानी (रोटरी क्लब संस्थापक), रवींद्र नामदे (संचालक सदस्यत्व विकास), समीर देशपांडे (जनसंपर्क अधिकारी ), कल्याणी कुलकर्णी (संचालक मंडळ प्रशासन), गौरव शर्मा (संचालक सेवा प्रकल्प नॉन मेडिकल),  महेंद्र पेशवानी (संचालक सेवा प्रकल्प – वैद्यकीय), आरती कुराआ (संचालक सेवा प्रकल्प – साक्षरता), निनाद साळुंखे (संचालक युवा सेवा), संतोष अगरवाल (क्लब ट्रेनर) यांची निवड करण्यात आली आहे.

अध्यक्ष रो.  जिग्नेश अगरवाल  म्हणाले, पिंपरी चिंचवड शहारातील सामाजिक संघटनांबरोबर आरोग्य विषयी कार्यक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला. पुढील वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.  या क्लबच्या माध्यमांतून समाज उपयोगी कार्य सुरु करण्यात येणार आहे.   त्यानंतर विविध विषयांवर काम करण्यात येणार आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात काम करण्यात येणार आहे.

गणेश जामगांवकर यांनी रोटरी क्लब ऑफ आकुर्डीने आजवर केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक क्षेत्रात काम करताना येणा-या अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी करावे लागणारे नियोजन याबाबत त्यांनी माहिती दिली.

सचिव  शशिकांत शर्मा यांनी पुढील काळात रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या वतीने पुढील काळात राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली.  सूत्रसंचालन रसिका कुलकर्णी  यांनी केले. आभार पुष्पा पमनानी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.