Pimpri News : उंच झाडावर अडकलेल्या दोन घारींची सुटका

एमपीसी न्यूज – उंच झाडावर मांज्यामध्ये अडकून पडलेल्या दोन घारीची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. ही कामगिरी रविवारी (दि. 13) गांधीनगर, पिंपरी येथे करण्यात आली.

हरी खरात हे रविवारी सकाळी पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालयात आले. त्यांनी गांधीनगर येथे एका झाडावर दोन घारी अडकल्या असल्याची माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन विभागाच्या जवानांनी गांधीनगर येथे धाव घेतली. उंबराच्या झाडावर सुमारे 30 फूट उंचीवर दोन घारी अडकल्या होत्या.

पतंगाच्या मांज्यात या घारी अडकल्या असल्याने त्यांची सुटका करणे जिकरीचे झाले. जवानांनी झाडावर चढून घारींची सुटका केली. मांज्यातून सुटका झाल्यानंतर काही वेळेतच घारींनी आकाशात झेप घेतली.

दिघीत म्हशींची सुटका

दिघीमध्ये भिंत आणि तारेच्या कंपाउंडमध्ये काही म्हशी अडकल्या असल्याची माहिती पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला रविवारी सकाळी मिळाली. त्यानुसार जवानांनी दिघी येथील दत्तनगर येथे धाव घेतली. सीमाभिंत आणि तारेच्या कंपाउंडमध्ये काही म्हशी गेल्या. मात्र पुढे पाईप असल्याने त्यांना पुढे बाहेर पडता येईना. जागा अरुंद असल्याने म्हशींना वळता देखील येईना. अग्निशमन विभागाच्या जवानांनी अडकलेल्या म्हशींची सुखरूप सुटका केली.

‘मेरी आवाज ही पहचान है’… पाहा संपूर्ण कार्यक्रम!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.