Talegaon Dabhade : आजची पिढी नव्या तंत्रज्ञानातून भारताला महासत्ता बनवत आहेत – मदन बाफना

एमपीसी न्यूज – भारत हा तरुणांचा देश आहे. आजची तरुण पिढी अत्यंत हुशार (Talegaon Dabhade) आहे. ही नवीन पिढी नाॅलेज घेऊन जन्माला आली आहे. बहुजन समाजातील मुलं आज नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन  भारताला महासत्ता बनवित असल्याचे गौरवद्गार माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी काढले.

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा मदन बाफना यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेशभाई शहा, विश्वस्त निरूपा कानिटकर, संजय साने, विलास काळोखे, संदीप काकडे, युवराज काकडे,परेश पारेख,आयर्न मॅन विशाल शेटे, स्कॉड्रन लीडर शैलेश पोळ,इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे, बी व डी फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय आरोटे,प्रा जी एस शिंदे आदी उपस्थित होते.

Pune : कारागृह विभागातील 17 अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहीर

बाफना म्हणले, नवीन पिढीकडे उमर आणि उमंग पाहिजे. या दोन्ही  गोष्टींच्या बरोबर जग आपोआप पुढे जात असते. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या कामाची प्रशंसा करताना बाफना म्हणाले की, काकडे तरुण आहेत. त्यांच्या दूरदृष्टीने संस्थेची वाटचाल योग्य दिशेने जात असल्याबद्दल बाफना यांनी समाधान व्यक्त केले. काकडे यांना टाटा उद्योगरत्न पुरस्कार मिळाल्याबददल बाफना यांनी त्यांचा सन्मान केला.

संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे म्हणाले, आपल्या तट्टांना आता यमुनेचे नाही तर चीनच्या नद्यांचे पाणी पिण्याची (Talegaon Dabhade) गरज आहे. देशाचा कारभार तरुण पिढीकडे जात आहे. आजच्या मेक इन इंडियामध्ये तरुणांना व्यापक प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत.

आपल्याला लागणारा कच्चा माल आपल्याकडेच उत्पादित झाला पाहिजे आणि तयार होणारा माल जागतिक बाजारेठेत गेला पाहिजे असे प्रतिपादन करत काकडे यांनी तरुणांमधे उद्योजकतेचे प्राण फुंकले. आपल्या क्षमता वापरून आपण चांगली निर्मिती करू शकलो आणि देशाच्या प्रगतीस अगदी छोटासा हातभार जर लावू शकलो तर आपण झेंड्याला सलामी देण्यास पात्र आहोत असे काकडे यावेळी म्हणाले.

काव्या अकादमीच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालयात चालविल्या जाणा-या प्रशिक्षण केंद्रातील पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून निवड झालेले महाविद्यालयातील विद्यार्थी विशाल भोसले, वैभव पाचपुते, सुरज मराठे, ओमकार भेगडे, माधुरी किर्वे, श्रुती मालपोटे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक शंकर हुरसाळे आणि आयर्न मॅन विशाल शेटे आदींचा सन्मान इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी प्रास्ताविक केले.  प्रास्ताविकात ते म्हणाले, “मदन बाफना आणि कृष्णराव भेगडे यांनी तालुक्याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठे योगदान देऊन मावळ तालुका घडवला आहे. मावळ तालुका औद्योगिक क्षेत्रात पुढे जात आहे. क्रांतीचे दुसरे चक्र फिरत आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रामदास काकडे यांच्या माध्यमातून मावळ तालुका औद्योगिक क्रांतीचे केंद्र बनले आहे. संस्थेतील सहा-सात हजार विद्यार्थ्यांना व मावळ तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना अनेक तरुणांच्या हाताला काम मिळत आहे.”

कार्यक्रमानंतर संस्थेकडून विद्यार्थ्यांना अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात (Talegaon Dabhade) आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.