Pune : कारागृह विभागातील 17 अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहीर

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृह (Pune) येथे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘माझी माती माझा देश- मातीला नमन, वीरांना वंदन’ या उपक्रमांतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Pune : स्वातंत्र्यदिनी राज्यातील कारागृहातून 186 बंदी मुक्त

स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र कारागृह विभागातील एकूण 17 अधिकारी व कर्मचारी यांना पदके जाहीर झाली आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पदके महाराष्ट्र कारागृह विभागास जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये 5 अधिकारी कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक तसेच 12 अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक घोषित करण्यात आले आहे.

पदक प्राप्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अपर पोलीस महासंचालक गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर व कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे (Pune) यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक घोषित झालेले अधिकारी, कर्मचारी –
सुनील निवृत्ती ढमाळ, अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह
तात्यासाहेब सदाशिव निंबाळकर तुरुंगाधिकारी (श्रेणी-1)
प्रकाश बाबुराव उकरंडे, तुरुंगाधिकारी (श्रेणी-1)
आनंद शंकर हिरवे, सुभेदार
गणेश पांडुरंग घोडके, हवालदार

गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक घोषित झालेले अधिकारी, कर्मचारी-
अनिल हणमंत खामकर, अधीक्षक येरवडा खुले कारागृह
वामन तुकाराम निमजे, तुरुंगाधिकारी (श्रेणी-1)
विजय ज्ञानेश्वर कांबळे, तुरुंगाधिकारी (श्रेणी-1)
तानाजी कृष्णा धोत्रे, तुरुंगाधिकारी (श्रेणी-2)
किशोरीलाल सुकराम रहांगडाले, सुभेदार
विजय लाडकू पाटील, सुभेदार
प्रकाश महादेव सातपुते सुभेदार
चंद्रकांत नारायण बोसोडे, सुभेदार
बाबासाहेब हनुमंत चोरगे कारागृह शिपाई
दत्तात्रय किसन भोसले, कारागृह शिपाई
अशोक कुंडलिक आडाळे, कारागृह शिपाई
सुधाकर रामकृष्ण माळवे, कारागृह शिपाई

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.