Talegaon : प्रतिसाद फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम बांधवांना फळ व मास्कचे वाटप

एमपीसीन्यूज : रमजान महिन्यात रोजाच्या उपवासाचे औचित्य साधून प्रतिसाद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व प्रतिसाद फाउंडेशनचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील यांच्या हस्ते मुस्लिम बांधवांना फळ व मास्कचे वाटप करण्यात आले.

तळेगाव दाभाडे येथे झालेल्या कार्यक्रमात तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष रवींद्र माने, प्रभारी वैभव कोतुळकर, कार्याध्यक्ष महेंद्र पळसे, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख रशीद शिकीलकर, नगरसेविका संध्या भेगडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती दिलीप शहा, शोभा परदेशी आदी उपस्थित होते.

या महिन्यात उपवास म्हणजे आत्म्याचे, आचारविचारांचे शुद्धीकरण होय. रमजानमधील “रोजा” म्हणजे सहरीपासून इफ्तारपर्यंत निव्वळ अन्न-पाण्यापासून दूर राहून भुकेची जीवघेणी यातना सहन करणे एवढेच नव्हे तर आखून देण्यात आलेली कुंपणे, बंधने, मर्यादा यांचे तंतोतंत पालन या महिन्याच्या वर्तुळात राहून करणे होय.

या कार्यक्रमाचे नियोजन प्रतिसाद फौंडेशनचे किरण ओसवाल, ललित गोरे, गौरव गुंड, अनिल नाटे, विशारद कोतुळकर, आनंद दाभाडे पाटील, अॅड.विनय दाभाडे, प्रशांत एकनाथ दाभाडे, रणजित पिंगळे व कार्यकर्त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.