Talegaon : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी गणेश खांडगे

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी तळेगाव दाभाडे येथील गणेश वसंतराव खांडगे यांची फेरनिवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली. गणेश खांडगे यांनी यापूर्वी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक आहेत.

गणेश खांडगे हे मागील अनेक वर्षांपासून तालुका व जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. खांडगे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून क्रियाशील सदस्य आहेत. तसेच ते मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलचेही संस्थापक आहेत. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे माजी संचालक आणि तळेगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षपदही त्यांनी यापूर्वी भूषविलेले आहे. खांडगे उत्कृष्ट संघटक असून विविध सामाजिक, सहकारी, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत, यामुळे त्यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.

खांडगे यांच्या निवडीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी तसेच पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणार असल्याचे खांडगे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.