BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसची पेट्रोल पंपावर निदर्शने 

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – वाढत्या इंधन दरवाढीविरोधात पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज (गुरुवारी)शहरातील पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली. तसेच सरकारविरोधी पत्रके वाटून जनजागरण आंदोलन करण्यात आले.

दापोडीतील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्याला युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाला सुरुवाक करण्यात आली. दापोडी, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, मोशी, चिखली, भोसरी, सांगवी या  परिसरातील पेट्रोल पंपावर जाऊन युवक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिका-यांनी  आंदोलन केले.

इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दर कपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग करण्यापेक्षा सरकारने पेट्रोल आणि डिझेल जीएसटी मध्ये समावेश करावा. राज्य व केंद्राने लावलेले उपकार रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, युवकचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, सरचिटणीस डॉ. स्नेहल खोब्रागडे, गौरव चौधरी, अनिकेत आरकडे, सिध्दार्थ वानखेडे, अक्रम शेख, विरेंद्र गायकवाड, कुंदन कसबे, सौरभ शिंदे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, संदेश बोर्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

.

HB_POST_END_FTR-A1
.