CNG Rate : पेट्रोल, डीझेल स्थिर पण सीएनजी, पीएनजी महागला

एमपीसी न्यूज – मागील आठ दिवसांपासून पेट्रोल आणि डीझेल स्थिर आहे. परंतु सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुधवारी मुंबईत सीएनजी पाच रुपये तर पीएनजी 4.50 रुपये प्रती घन मीटर प्रमाणे वाढले आहे. गुरुवारी देशाची राजधानी दिल्लीत देखील सीएनजी 2.50 रुपये आणि पीएनजी 4.25 रुपये प्रती घन मीटर प्रमाणे वाढले आहेत.

22 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत देशात पेट्रोल आणि डीझेल तब्बल 10 रुपयांनी वाढले. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रती लिटर, डीझेल 104.77 रुपये प्रती लिटर आहे. दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रती लिटर, डीझेल 96.67 रुपये प्रती लिटर आहे. 6 एप्रिल रोजी 80 पैशांनी पेट्रोल आणि डीझेल वाढले आणि या किमती तेंव्हापासून स्थिर आहेत.

बुधवारी मुंबई महानगर गस लिमिटेडने सीएनजी पाच रुपयांनी तर पीएनजी 4.50 रुपयांनी वाढवला. त्यामुळे मुंबईमध्ये सीएनजी 72 रुपये तर पीएनजी 45.50 रुपये या प्रमाणे मिळत आहे.

गुरुवारी दिल्लीसह अन्य शहरांमध्ये देखील सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ झाली. दिल्लीत सीएनजी 2.50 रुपयांनी वाढून 71.61 रुपयांवर पोहोचला आहे. तर पीएनजी 4.25 रुपयांनी वाढून 45.86 रुपयांवर पोहोचला आहे. यासह नोएडा, ग्रेटर नोएडा, गाजियाबाद, मुजफ्फरनगर, मेरठ, शामली, गुरूग्राम, रेवाडी, करनाल, कानपूर, हमीरपुर, फतेहपुर, अजमेर, पाली, राजसमंद आदी शहरात देखील सीएनजी, पीएनजीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.