Talegaon News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी शाम पोशेट्टी यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी शाम पोशेट्टी यांची राज्यशासनाने नियुक्ती केली आहे. गेली दोन महिने मुख्याधिकारीपद रिक्त असल्याने तळेगाव नगरपरिषदेच्या विकास कामांचा वेग मंदावला होता. आता नव्याने मुख्याधिकांऱ्यांची नियुक्ती झाल्याने आता विकास कामे सुरळीत मार्गी लागतील अशी सामान्य नागरिकांकडून भावना व्यक्त होत आहे.

यापूर्वीचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची 29 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील नगरपालिका प्रशासनाकडे बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त होते, प्रभारी मुख्याधिकारी म्हणून चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे हे काम पाहत होते.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कामाचा विशेष बोजा प्रशासनावर येत असल्याने मुख्याधिकारीच नसल्याने कुचंबना होत होती. प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नानासाहेब कामठे हे तळेगाव आणि चाकण येथे येऊन- जाऊन कारभार पाहात होते.

वेगवेगळ्या राजकीय नेते व पक्षांनी याबाबत मागणी केली होती, राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासनाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी मुख्याधिकारी म्हणून शाम पोशेट्टी यांची नियुक्ती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.