Talegaon News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेस इंदोरीत उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या कोविड 19 चे निर्मूलन करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेस इंदोरी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या मोहिमेत एकूण 2291 कुटुंबातील 9261 जणांचे सर्व्हेक्षण करुन शरिराचे तापमान व ऑक्सिमीटरचे मदतीने ऑक्सिजन व पल्स नोंदी घेण्यात आल्या. त्यानुसार 40 कोरोना संशयितांची तपासणी डाॅ. प्रवीण कानडे व सहकाऱ्यांनी केली असता त्यातील 10 जण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले.

टप्प्याटप्प्याने पुन्हा तपासणी व सर्व्हेक्षण  करण्यात येणार आहे, असे ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी यांनी सांगितले. मावळचे गट विकास अधिकारी सुधीर भागवत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सर्व्हेक्षण कामाची पाहणी केली.
डाॅ. कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली  प्राथमिक व माध्यमिक शाळांतील  शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर्स यांनी स्वयंसेवकांचे मदतीने तपासणी व सर्व्हेक्षण काम पूर्ण केले.
सरपंच किर्ती पडवळ, उपसरपंच नितीन ढोरे व सर्व ग्रा.पं.सदस्य व कर्मचारी वर्ग यांनी नियोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.