Talegaon News : हर्षल आल्पे लिखित दिग्दर्शित साखळी या लघु चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील कार्यक्षम नगरसेवक निखिल शेठ भगत यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने एकतेचं महत्व सांगणार्‍या “साखळी” या लघु चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. लवकरच हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे.

लेखक दिग्दर्शक हर्षल आल्पे यांनी या चित्रपटाची पटकथा तसेच दिग्दर्शन केले आहे, तर या चित्रपटाची संकल्पना आणि कथा जुई रणदिवे यांची आहे. या लघु चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर विशाल कुलकर्णी यांनी केले आहे तसेच याचे संकलन उदयोन्मुख व ताज्या दमाचे कलाकार अनिरुद्ध जोशी हे करत आहेत तर हर्षल यांना दिग्दर्शनात सहाय्य केले आहे समीर दिवाकर यांनी.

या लघु चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन सम्राट काशीकर यांनी केलं आहे. तसेच या लघुचित्रपटात अनिरूद्ध जोशी, सायली बुधकर, दक्षा ओक, हरिष पाटील, समीर दिवाकर प्रमुख भूमिकेत तर विद्याधर पुराणिक हे एका विशेष भूमिकेत दिसणार आहेत.

तळेगावमधील निसर्गरम्य परिसरात या लघुचित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असून या चित्रपटाला संविद पाटील, अभिषेक कुलकर्णी यांनी विशेष सहाय्य केले आहे.

“आपल्यातील एकतेची ही अशी साखळी कधीच तुटली नाही पाहिजे”, या वाक्यावरील या लघु चित्रपटाला आत्ता पासूनच सर्व थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळत आहे , लोकप्रिय तसेच कार्यक्षम नगरसेवक निखिल भगत यांनी आपले बहुमूल्य योगदान दिले आहे तसेच राष्ट्राय स्वाहा प्रॉडक्शनने याची प्रस्तुती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.