Talegaon News : तळेगाव एमआयडीसी पोलीस दक्षता समिती अध्यक्षपदी शोभा कदम

एमपीसीन्यूज – आंबळे ग्रुपग्रामपंचायतीच्या माजी सरपंच शोभा कदम यांची तळेगाव एमआयडीसी पोलीस महिला दक्षता समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणा-या गावांमधे महिला दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीच्या अध्यक्षपदी  कदम यांची व उपाध्यक्षपदी पंचायत समितीच्या माजी सदस्या ललिता कोतुळकर यांची निवड करण्यात आली आहे.

समितीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील व महिला पोलीस नाईक काजल आघाव यांच्या सहकार्याने कामकाज सुरु राहणार आहे. काजल आघाव यांनी या निवडीची घोषणा शुक्रवार (दि. 23 ) रोजी केली.

शोभा कदम ह्या पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या असून या अगोदर त्यांनी आंदर मावळ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली आहे. कदम या निष्ठावंत व प्रामाणिकपणे काम करणा-या कार्यकर्त्या असून उत्तम संघटक म्हणून सुपरिचित आहेत.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातंर्गत येणा-या गावांमधील विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना दक्षता समितीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मनोदय कदम यांनी व्यक्त केला.

कार्यकारिणी पुढील प्रमाणे

शोभा सुदाम कदम (अध्यक्ष ), ललिता सत्यवान कोतुळकर (उपाध्यक्ष ), माधुरी बाळासाहेब गाडे, शिल्पा रमेश घोजगे, सुवर्णा चंद्रकांत घोलप, उषा तानाजी तांबोळी, सुमन महेंद्र वारींगे, ज्योती मुकुंद इंगळे, मनिषा काळुराम जाधव, मंगल रामनाथ घोजगे, आशा पंडित जाधव, कल्पना रामकृष्ण कडू, अनिता अतकरे, विद्या काशिद ( सर्व सदस्या )

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.