Talegoan : सरस्वती विद्या मंदिरमध्ये ‘एकता दिन’ उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – सरस्वती विद्या मंदिरमध्ये एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 31 ऑक्टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एकता दिनाबद्दल मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी माहिती दिली.

मुख्याध्यापिका रेखा परदेशी, पर्यवेक्षिका सुरेखा रासकर, वृषाली झेंड, सीमा गोखले, संजय गायकवाड व विद्यार्थी प्रतिनिधींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

आपल्या भारताची एकता अखंड टिकून रहावी, यासाठी संजय गायकवाड सरांनी सर्वांना एकतेची प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर गायकवाड सरांबरोबर विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातून एकता दौड काढली. संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, कार्यवाह प्रमोद देशक, खजिनदार सुचित्रा चौधरी यांनी सर्वांना एकता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील परदेशी आणि मोहन शेवकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.