Pimpri : शहरात उत्तर भारतीय बांधवांकडून छठ पूजा उत्साहात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख घाटांवर उत्तर भारतीय बांधवांनी आज छठ पूजा मोठ्या उत्साहात केली. सायंकाळी पारंपारिक वेशभूषेत महिला-पुरूष व बालचमू मोठ्या संख्येने शहरातील घाटावर उत्तर भारतीय बांधव एकत्रित आले होते. यावेळी सूर्याला अर्घ्य देऊन पूजा करण्यात आली. 

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील दिवाळीनंतर येणा-या षष्ठीला म्हणजेच सहाव्या दिवशी छठ पूजा करण्याची उत्तर भारतीयांची प्राचीन परंपरा आहे. याला छठ महापर्व असेही म्हणतात. या दिवशी दिवसभर उपवास करून सूर्याला अर्घ्य देऊन सूर्य आणि सर्व निसर्ग देवतांची प्रार्थना करून मंगल कामना करण्यात येते. दिवाळीसोबतच या पूजेचीही तयारी केली जाते. या पूजेसाठी विशेष प्रकारचे लोक गीत उत्तर भारतीय महिलांमध्ये प्रसिद्ध आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व मुख्य घाटांवर छठ महापर्व पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकत्रित येऊन सूर्याला अर्घ्य देऊन पारंपारिक पद्धतीने पूजा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.