Talwade : तळवडे परिसरात सुरक्षिततेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

एमपीसी न्यूज – तळवडे परिसरात लघुउद्योजकांचे जाळे उभारले आहे. सॉफ्टवेअर पार्क आणि चाकण औद्योगिक वसाहत,  तळेगाव आणि मवळ औद्योगिक वसाहत यांना जोडणारा मार्ग तळवडे परिसरातून जात आहे. त्यामुळे येथे सॉफ्टवेअर अभियंत्याची, कामगार वर्गातची वर्दळ असते. यासोबतच या परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तळवडे परिसरात विविध ठिकाणी महापालिकेच्यावतीने सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी स्विकृत सदस्य पांडुरंग भालेकर यांनी महापौर राहूल जाधव यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आह.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, तळवडे परिसरात सॉफ्टवेअर अभियंत्यांना लूटमार करण्याच्या घटना घडल्या आहेत महिन्याच्या सुरुवातीला लघुउद्योगात काम करणा-या कामगार, तसेच महिला कामगार यांची लूटमार होत असते. कितयेक वेळेस पायी जाणा-या कामगारांच्या हातातील मोबाईल, किंमती वस्तु, महिला कामगारांच्या हातातील पर्स हिसकावून दुचाकीवरुन आलेल्या भुरट्यांनी पोबारा केला असल्याने कामगारांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

या प्रकारामुळे रात्री उशिरा यामार्गाने महिला कामगारांना असुरक्षित वाटत असल्याचे निवेदनांत म्हटले आहे. तळवडे परिसरात सॉफ्टवेअर अभियंत्यांना लूटमार करण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकत असल्याची मागणी होत आहे.

तळवडे सॉफ्टवेअर पार्क तेथील कै. पंढरीनाथ भालेकर चौक, सिंटेल चौक, स्टेरिया चौक, तळवडे गावठाण चौक, तळवडे स्मशानभूमी, ज्योतिबानगर येथील भालेकर चौक आणि त्रिवेणीनगर चौक याठिकाणी महापालिकेच्यावतीने सीसीटिव्ही कॅमेरे बसवन त्याचे व्यवस्थापन करावे अशी मागणी करणारे निवेदन फ प्रभाग समिती स्विकृत पांडुरंग भालेकर यांनी केले. यावेळी उद्योजक रामदास कुटे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.