Tata Business News : 24 तासांत 1,603 किमीचा पल्ला; टाटा अल्ट्रॉजची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

एमपीसी न्यूज – टाटाच्या अल्ट्रॉज या कारने 1 हजार 603 किलो मीटरचा पल्ला 24 तासांत पार करत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. सातारा ते बंगळुरू असा नॉन स्टॉप प्रवास करणाऱ्या अल्ट्रॉज कारची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. पॅसेंजर कारमध्ये असा विक्रम नोंदविणारी ही एकमेव कार आहे.

पुण्यातील देवजीत सहा हे हौशी कार चालक या रेकॉर्डचे साक्षीदार ठरले. त्यांनी 15 डिसेंबरला साता-यातून प्रवासाला सुरुवात केली आणि 24 तासांत 1 हजार 603 किलो मीटरचा बंगळुरू पर्यंतचा प्रवास पूर्ण केला.

याबाबत सहा म्हणाले, ‘हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय होता. अल्ट्रॉज’ची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’साठी निवड मनस्वी आनंद देणारी आहे, असे त्यांनी नमूद केले. टाटा अल्ट्रॉज आणि टाटाचे कर्मचारी यांच्या शिवाय हा प्रवास आणि शक्य नव्हता. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अल्ट्रॉज किफायतशीर आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणारी कार आहे’, असे सहा म्हणाले.

टाटाचे प्रवासी वाहन व्यवसाय विभाग विपणन प्रमुख विवेक श्रीवात्स म्हणाले, ‘देवजीत सहा यांचे अभिनंदन. त्यांनी या प्रवासासाठी अल्ट्रॉज कारची निवड केल्याबद्दल कंपनीच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. लांब पल्ल्याच्या प्रवासात टाटा अल्ट्रॉजने नवा बेंचमार्क स्थापित केला आहे.

डिझाईन, सुरक्षा, आरामदायी आणि किफायतशीर प्रवास याबाबत कार सरस होतीच. नव्या रेकॉर्डमुळे कारच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.