Talegaon Dabhade : ‘स्वातंत्र्य समर’ महानाट्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील (Talegaon Dabhade)सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे ॲड. विनय दाभाडे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या ‘स्वातंत्र्य समर’ या महानाट्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. या महानाट्यात देशातील 950 वर्षापासूनचा स्वातंत्र्याच्या इतिहासाचा मागोवा घेण्यात आला असून यामध्ये 158 क्रांतिकारकांचे योगदान मांडण्यात आले आहे. या महानाट्यामध्ये सुमारे 525 कलाकारांनी सहभाग घेतला.

ॲड विनय दाभाडे व प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे (Talegaon Dabhade)यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील, माळवाडीचे उपसरपंच दीपक दाभाडे, स्वातंत्र्यसमर महानाट्याचे दिग्दर्शक ॲड विनय दाभाडे, खजिनदार निलेश दाभाडे,कार्याध्यक्ष सुनील दाभाडे, राजू दाभाडे, सतीश दाभाडे, खजिनदार विनोद दाभाडे, लॅब टेक्निशियन सौरभ चिंचवडे आदी उपस्थित होते.

Pimpri : कांद्यावरील निर्यात शुल्क मागे हा शेतकऱ्यांचा विजय – काशिनाथ नखाते

ॲड विनय दाभाडे लिखित व दिग्दर्शित स्वातंत्र्य समर महानाट्याचा प्रयोग एक डिसेंबर ते चार डिसेंबर 2022 या दरम्यान प्रतिष्ठानकडून तळेगाव दाभाडे येथे करण्यात आला होता. या महानाट्यात देशातील 950 वर्षापासूनचा स्वातंत्र्याच्या इतिहासाचा मागोवा घेण्यात आला होता. यामध्ये 158 क्रांतिकारकांचे योगदान मांडण्यात आले होते. या महानाट्यामध्ये सुमारे 525 कलाकार सहभागी झाले होते.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या ‘स्वातंत्र्य समर’ महानाट्याची नोंद समाविष्ट करण्यासाठी श्रीमंत सत्यशिल राजे दाभाडे व श्रुती गावडे यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

ऐतिहासिक क्षेत्रातील अशा महानाट्याचा प्रयोग सादर करून तळेगाव दाभाडेचे नाव जागतिक पातळीवरती निर्माण केले याचा सार्थ अभिमान असून भविष्यकाळात ह्या महानाट्याची वर्ल्ड बुक मध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संस्थापक संतोष दाभाडे यांनी सांगितले.

स्वागत दीपक दाभाडे यांनी केले. प्रास्ताविक ॲड विनय दाभाडे यांनी केले तर आभार निलेश दाभाडे यांनी मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.