Tata CSR : टाटाच्या सीएसआर फंडातून 7.5 लाख लोकांना लाभ, वार्षिक अहवाल सादर

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सकडून आर्थिक वर्ष 2021 साठीचा सातवा वार्षिक सीएसआर अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये वर्षादरम्‍यान करण्‍यात आलेल्‍या सामुदायिक उपक्रमांच्‍या माध्‍यमातून 7.5 लाखांहून अधिक लोकांना लाभ मिळाला आहे. 

अहवालामधील ठळक वैशिष्‍ट्ये: 

स्‍थलांतरित, रोजंदारी कामगार, उदरनिर्वाह गमावलेल्‍या आणि संक्रमण शिबिरांमध्‍ये अडकून राहिलेल्या किंवा आसरा घेण्‍यास भाग पडलेले लोक अशा 1.4 लाखांहून अधिक लोकांना मदतीचा हात पुढे करत कोविड-19 मदतकार्यांना पाठिंबा दिला.

– तीस हजार लोकांना 3.4 लाखांहून अधिक शिजवलेल्‍या आहाराची सेवा दिली, वीस हजार कुटुंबांना शंभर टनांहून अधिक ड्राय रेशनचा आणि 24 पोलिस चौकींना सुरक्षित पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या तीस हजार युनिट्सचा पुरवठा करण्‍यात आला.

– सरकारी हॉस्पिटल्‍स आणि खास उभारण्‍यात आलेल्‍या कोविड-19 उपचार केंद्रांना व्‍हेण्टिलेटर्स, बेड्स व ऑक्सिजन सिलिंडर्स दान करत आरोग्‍य पायाभूत सुविधा सुधारण्‍यामध्‍ये साह्य केले.

– लॉकडाऊन दरम्‍यान हजारो ट्रक ड्रायव्‍हर्ससाठी अन्‍न, मास्‍क्‍स व सॅनिटायझर्ससोबत सुरक्षितता, आरोग्‍य व स्‍वच्‍छतेसाठी घ्‍यावयाच्‍या खबरदारीबाबत माहितीपूर्ण किट्सची व्‍यवस्‍था करण्‍यात आली.

– कोविड-19 मदतकार्याप्रती जवळपास सात कोटी रूपयांचे दान करण्‍यात आले, ज्‍यामध्‍ये 50 टक्‍के योगदान कंपनीच्‍या कर्मचा-यांचे होते.

– कंपनीच्‍या आरोग्‍य उपक्रमामधून 3.8 लाखांहून अधिक लोकांना लाभ मिळाला. त्‍यांच्‍या उपक्रमांतर्गत उपचार करण्‍यात आलेल्‍या 60 टक्‍के कुपोषित मुलांचे आरोग्‍य आता उत्तम आहे.

– टाटा मोटर्सच्‍या विद्याधनम प्रोग्रॅमच्‍या माध्‍यमातून 1.2 लाखांहून अधिक विद्यार्थ्‍यांना दर्जेदार शिक्षण मिळाले. जवाहर नेहरू विद्यालय (जेएनव्‍ही) सोबतच्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून कंपनीने जेईई व नीट (NEET) परीक्षा देणा-या विद्यार्थ्‍यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण सुरू केले.

– टाटा मोटर्सच्‍या कौशल्‍य उपक्रमांतर्गत जवळपास अठरा हजार तरूण व शेतक-यांना प्रशिक्षण देण्‍यात आले. त्‍यांच्‍यापैकी 69 टक्‍के तरूण व शेतक-यांना रोजगार मिळाला असून त्‍यांच्‍या संबंधित वार्षिक घरगुती उत्‍पन्‍नामध्‍ये 1 लाख रूपयांची भर झाली आहे.

– तग धरून राहण्‍याची क्षमता 87 टक्‍के असलेल्‍या स्‍वदेशी प्रजातींच्‍या जवळपास 1.1 लाख रोपट्यांची लागवड केली, ज्‍यामुळे काही क्षेत्रे वनस्‍पती व प्राण्‍यांच्‍या विविध प्रजातींसाठी सूक्ष्‍म-अधिवासामध्‍ये बदलली.

– जवळपास एक लाख मुलांना स्‍वच्‍छ व हरित पर्यावरणाचे लाभ आणि पर्यावरणाच्‍या संवर्धनासाठी आवश्‍यक असलेल्‍या उपायांबाबत जागरूक केले.

– आपल्‍या अमृतधारा उपक्रमाच्‍या माध्‍यमातून स्थिर आधारावर प्रतिदिन प्रति दरडोई क्षेत्र 30 लीटर पोर्टेबल पिण्‍याचे पाणी दिले, ज्‍यामुळे देशाच्‍या पाणी कमी असलेल्‍या भागांमध्‍ये राहणा-या आठ हजाराहून अधिक लोकांना पाणी उपलब्‍ध झाले.

– टाटा मोटर्सने पालघरच्‍या नऊ हजार आदिवासी समुदायांचा जीवनाचा दर्जा सुधारण्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाचा सीएसआर कक्ष ‘सहभाग’सोबत सहयोग केला. अशाच प्रकारचा उपक्रम गुजरातमधील अहमदाबाद येथील देवेडथल गावामध्‍ये यशस्‍वीरित्‍या राबवला.

– टाटा मोटर्सच्‍या 37 टक्‍क्‍यांहून अधिक कर्मचारी व त्‍यांच्‍या कुटुंबांनी स्‍व-इच्‍छेने सामाजिक कार्याप्रती हातभार लावला, ज्‍याअंतर्गत त्‍यांनी प्रकल्‍पांसाठी स्‍व-इच्‍छेने 38 हजार 400 तासांहून अधिक वेळेपर्यंत काम केले.

कंपनीच्‍या उपक्रमांनी वर्षभर 7.5 लाखांहून अधिक लोकांच्‍या जीवनामध्‍ये सकारात्‍मक परिणाम घडवून आणला आणि 45 टक्‍क्‍यांहून अधिक लाभार्थींमध्‍ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील समुदायांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.