TET Exam Scam: TET गैरव्यवहार प्रकरणात 7880 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज: राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर अनेक खळबळ जनक गोष्टी समोर आल्या होत्या. या प्रकरणात आता राज्य परीक्षा परिषदेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात नाव आलेल्या तब्बल 7880 उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे.(TET Exam Scam) या सर्वांना आगामी शिक्षक पात्रता परीक्षेला बसता येणार नाही. याशिवाय ज्या उमेदवारांची नावे या घोटाळ्यात आहेत आणि ते सेवेत आहेत अशांची सेवा देखील लवकरच संपुष्टात करण्यात येणार आहे.

Moshi Garbage: देहूरोड, खडकी कॅन्टोन्मेंटचा कचराही मोशी कचरा डेपोत आणणार

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 2019-20 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणात पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सुरू झालेल्या पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे उघड झाले होते.

या घोटाळ्यात शिक्षण परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह आणखी काही मोठ्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.(TET Exam Scam) यातील आरोपींच्या घरातून पोलिसांनी कोट्यावधी रुपयांची संपत्ती देखील जप्त केली होती.

पुणे पोलिसांनी या घोटाळ्यातील आरोपींवर पुणे सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यातील 7880 जणांवर आता राज्य शिक्षण परिषदेने कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.