Corporation Elections: प्रभाग रचनेतील बदलावरून पुन्हा घमासान, भाजप राष्ट्रवादी आमने-सामने

एमपीसी न्यूज:  राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतल आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या त्री सदस्य प्रभाग रचना रद्द करून आता त्या जागी चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. (Corporation Elections) मात्र या निर्णयावरून पुन्हा एकदा घमासान होण्याची शक्यता आहे. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केलाय. तर दुसरीकडे भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मात्र शिंदे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.

 

 

यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, महविकास आघाडी सरकारने बेकायदेशीरपणे महापालिकेची सदस्य संख्या वाढवली होती. वास्तविक जनगणना पूर्ण झाल्यानंतर त्या प्रमाणात सदस्य संख्या वाढविणे अपेक्षित होते. परंतु महाविकास आघाडीने चुकीचा निर्णय घेतला. प्रभागातील सदस्य संख्या तीन केली. नैसर्गिक सीमांचा विचार न करता अनिर्बंध पद्धतीने प्रभाग रचना केल्या. सत्तेचा दुरुपयोग केला. त्यामुळे अनेक होतकरू राजकीय कार्यकर्त्याची निवडणूक लढविण्याची संधी गमवावी लागली असती. आता भाजप सेनेच्या सरकारने पुन्हा चारचा प्रभाग केला आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. भौगोलिक सलगतेमुळे सर्वांना समान संधी मिळेल. भाजपचे महापलिकेतील संख्या बळ वाढून ते 110 च्या पुढे जाईल असा विश्वास वाटतो.

 

 

Maval Protest : कोथूर्णे येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ मावळ बंदची हाक

 

 

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र या निर्णयाचा विरोध केलाय. ते म्हणाले राज्य सरकारने प्रभाग रचना बदलण्याचा जो निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे. (Corporation Elections) या निर्णयामुळे महापालिका निवडणुका आणखी सात ते आठ महिने उशिरा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचेही जगताप यांनी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.