Maval Protest : कोथुर्णे येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ ‘मावळ बंद’ची हाक


एमपीसी न्युज :मावळातील कोथुर्णे गावामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Maval Protest) करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आज गुरुवारी (दि 4) विविध संघटनांकडून मावळ बंदची हाक देण्यात आली आहे.

या बंदमधून शाळा आणि शैक्षणिक संस्थांना वगळण्यात आले आहे. सर्व शाळा व शिक्षण संस्थांमध्ये पीडित मुलीला श्रद्धांजली अर्पण करावी, असे संबंधित सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मावळ तालुका हा ‘संतांची भूमी’ अशी ओळख असलेला तालुका. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मावळ तालुक्यात एका नराधमाने कोथुर्णे येथील सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिची निर्घृण हत्या केली.

या प्रकरणी कामशेत पोलिसांनी आरोपी तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय 24 वर्षे कोथूर्णे ता. मावळ) याला मोठ्या शिताफीने अटक केली.(Maval Protest) आरोपी तेजसने गुन्हा कबूल केला असून त्याच्यावर पोस्को, 363,302 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मावळ तालुक्यातील विविध संघटनांनी मावळ बंदची हाक दिली आहे.

MIssing Girl Murder: कोथुर्णे प्रकरणी एकाला अटक, अवघ्या 24 तासात छडा लावण्यात पोलिसांना यश

सोशल मीडियाच्या माध्यमातून मावळ बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे. शांततेच्या मार्गाने होणाऱ्या या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी तसेच पुढील काळामध्ये अशा घटना होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.