Pune : थायलंडच्या लष्करप्रमुखांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह मान्यवरांचीही दिवसभरात उपस्थिती

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव आणि दगडूशेठ गणपतीचे आकर्षण केवळ भारतातच नाही, तर परदेशातील भक्तांनाही आहे. याची प्रचिती सोमवारी सकाळी दगडूशेठची यंदाची सजावट असलेल्या राजराजेश्वर मंदिरात आली. पुण्यामध्ये लष्करी सरावाकरीता आलेल्या थायलंडच्या लष्करप्रमुखांसह सेनाधिका-यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत आरतीही केली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२६ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात थायलंडचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल कोकार्ट बुखाओ यांसह थायलंडच्या लष्करी अधिका-यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे सुनिल रासने, महेश सूर्यवंशी, उल्हास भट यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते.

थायलंडच्या लष्करी अधिका-यांप्रमाणेच भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, देवीसिंग शेखावत यांनी देखील गणरायाचे दर्शन घेत आरती केली. तर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी दिवसभरात गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टतर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.