Pune : भावनांच्या विविध छटा गीतातून सादर करीत अवधूत गुप्ते यांचा ‘स्वर जल्लोष’

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचा अभिमान जागविणारे जय जय महाराष्ट्र माझा…मरता मरता कळलं शेतकऱ्याला ( Pune ) किंमत नाही… हे  शेतकऱ्याची विदारक कहाणी सांगत खोलवर मनात रुतणारे गीत…आयुष्य हे कांदे पोहे…देवा तुझ्या नावाचं रं याडं लागलं…राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील का… अशी मानवी भावनांच्या विविध छटा असणारी गीते सादर करीत गायक अवधूत गुप्ते आणि सहकाऱ्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या संगीत महोत्सवात एकच ‘स्वर जल्लोष’ केला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून संगीत महोत्सवाचे आयोजन बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात केले आहे. महोत्सवात गायक अवधूत गुप्ते यांचा लाईव्ह इन कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते.

LokSabha Elections 2024 : मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोखपणे जबाबदारी पार पाडावी – डॉ.स्वप्नील मोरे

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सन्मिता धापटेने ‘हि गुलाबी हवा’ हे गीत सादर केले. त्यानंतर अवधूत गुप्ते यांनी ‘गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया’ हे गीत सादर करताच पुणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. ‘तुझे देख के मेरी मधुबाला’ , ‘देवा तुझ्या नावाचं र याड लागलं’, ‘गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी’, ‘तेरे मेरे होठो पे’ , ‘ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल’ या गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

‘जात साली जाता जात नाय’ हे रसिकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यानंतर सादर झालेल्या चंद्रा…उगवली शुक्राची चांदणी…मी तुझा फॅन झालोया..राणी माझ्या मळ्यामंदी या गाण्यांच्या सादरीकरणावर तरुणाई थिरकली. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाचा समारोप ( Pune ) झाला.

 

 

https://www.youtube.com/shorts/60GFMGPGf88

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.