Bjp Pune : पुण्यात भाजप राज्य कार्यकारिणीची राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक होणार

कार्यक्रमाच्या ठिकाणी इच्छुकांकडून जोरदार फ्लेक्स बाजी

 एमपीसी न्यूज : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला दुपारी तीन वाजता मार्गदर्शन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप (Bjp Pune) शहर पदाधिकाऱ्यांकडून तयारी करण्यात आली असून बालगंधर्व चौकात इच्छुकांकडून जोरदार फ्लेक्स बाजी करण्यात आली आहे.

Kishor Aware : किशोर आवारे हत्या प्रकरणातील खऱ्या सूत्रधाराला अटक करा; आवारे समर्थकांचा मोर्चा

भाजप राज्य कार्यकारिणी बैठकीच्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार गणेश नाईक हे उपस्थित झाले आहेत. तर, दुपारी तीन वाजता राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.

त्यानंतर साडे पाच वाजता राज्यातील खासदार आणि आमदार यांना जे. पी. नड्डा हे घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी येथे मार्गदर्शन करणार आहे. तर, बालगंधर्व रंगमंदिर परिसरात (Bjp Pune) भाजपच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांकडून जोरदार फ्लेक्स बाजी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.