Mumbai News : मुख्यमंत्री आज दुपारी एक वाजता साधणार जनतेशी संवाद

अनेक दिवसानंतर मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवारी, दि. 13) दुपारी एक वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. अनेक दिवसानंतर मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोरोना साथ आणि राज्याची परिस्थिती हा मुद्दा तर आता संवादातील महत्वाचा मुद्दा असेलच. पण त्याचबरोबर सध्या गाजत असलेल्या कंगना प्रकरणावर देखील मुख्यमंत्री बोलणार का, कंगना प्रकरणाने सध्या राज्याच्या राजकारणात चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेच्या पदाधिका-यांनी नौसेनेच्या माजी अधिका-याला केलेली मारहाण आणि त्यामुळे शिवसेनेची झालेली गच्छन्ती याबाबत मुख्यमंत्री काय बोलतील हे देखील पाहणे गरजेचे आहे.
मराठा आरक्षण या मुद्द्यावर देखील मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे.  यासोबतच आणखी कोणत्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री बोलतील याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.