Pimpri : बिग बॉसमधील शिवानी सुर्वे हिच्यावर कारवाई करण्याची मागणी 

एमपीसी न्यूज – बिग बॉस या मालिकेतील अभिनेत्री शिवानी सुर्वे या समाज कंटकेवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता  प्रदीप नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनांद्वारे केली आहे.

बिग बॉस ही रियालिटी शो रात्री कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्शित दररोज होत आहे. यामध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वे या स्पर्धकीने धुडगुस माजवला आहे. वारंवार शिवानी सुर्वे हिने आई बहिणींवरुन अश्लील शब्द प्रयोग केले आहेत. सर्व कुटुंब तो कौटुंबिक विरंगुळा व्हावा म्हणून मनोरंजनासाठी पाहतो. परंतु अशा नॅशनल टेलिव्हिजनमध्ये शिवानी सुर्वेसारख्या समाज कंटकांनी उत्पात केला आहे.

शिवानी हिचे वीणा जगताप, किशोरी शहाणे, पराग वगैरे स्पर्धकांशी वाद झाले आहेत. ते वाद कोणत्या स्तरावर घेऊन जाणे याचे भान रियालिटी शोच्या निर्मात्यांना व चॅनलला नसेल तर ही समाजासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.  शिवानी सुर्वेवर त्वरीत कारवाई व्हायला हवी. तसे न झाल्यास सहकारी आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.