MPSC Combine Exam : 4 सप्टेंबरला होणार एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ती दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती दिली आहे. 

एमपीएससीने याबाबत पत्रक जाहीर केले आहे . महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 11 एप्रिल 2021 रोजी नियोजित विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 9 एप्रिल 2021 रोजीच्या पत्रान्वये प्राप्त सूचनानुसार सदर परीक्षा आयोगाच्या संदर्भिय प्रसिध्दीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती.

यासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्या दिनांक 3 ऑगस्ट 2021 रोजीच्या पत्रान्वये प्राप्त अभिप्रायानुसार प्रस्तुत परीक्षा शनिवार दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी आयोजित करण्यात येईल असे पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.