Pimpri: गणेश मंडळे व सामाजिक संस्थांची बुधवारी चिंचवडमध्ये बैठक 

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव पर्यावरणपुरक करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळांचे अध्यक्ष, सामाजिक संस्था आणि पालिका पदाधिकारी, प्रशासनाची बैठक येत्या बुधवारी (दि.29) आयोजित करण्यात आली आहे. 

_MPC_DIR_MPU_II

चिंचवड,  येथील अॅटो क्लस्टरमध्ये बुधवारी दुपारी तीन वाजता महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

गणेशोत्सव जवळ आला आहे. बाप्पाच्या आगमनाच्या तयारीची लगबग औद्योगिकनगरीमध्ये जोरदार सुरु आहे. यंदाचा गणेशोत्सव हा पर्यावरणपुरक करण्यासाठी, त्याचे नियोजन करण्यासाठी पालिकेतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांनी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, पर्यावरण प्रेमींनी बैठकीला उपस्थित रहावे. आपल्या पर्यावरणाकरिता सूचना द्याव्यात, असे आवाहन महापौर जाधव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.