Nigdi : शहरातील एकमेव श्री भवानीमाता सांस्कृतिक महिला मंडळ

नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम

एमपीसी  न्यूज –  शहरात सध्या नवरात्र उत्सवात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. घटस्थापनेच्या दिवशी जयघोष व मिरवणुक काढून निगडीतील श्री भवानीमाता सांस्कृतिक महिला मंडळाने आदर्श ठेवला आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य   म्हणजे  मंदिरातील पूजा, स्वच्छता, विविध उपक्रम घेण्याचे निर्णय़ सर्व महिला मंडळ करीत आहे. दरवर्षी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम या मंडळामार्फत घेण्यात येतात. या मंडळाचा तितिक्षा महिला बचत गट देखीलकार्यरत आहेत. नवरात्रीत नऊ दिवस विविध उपक्रम घेण्यात येणार आहे. या नऊ दिवसांत अवयवदान, झाडे लावा झाडे जगवा, प्लॅस्टिकचा वापर कमी करा, बेटी बचाव बेटी पढाओ आदी फ्लेक्स  आदीबाबत जनजागृती या दरम्यान करण्यात येणार आहे.   अशी माहिती मंडळाच्या सचिव रेखा सुर्वे यांनी दिली. त्या म्हणाल्या, सोमवारी दि. 15 ऑक्टोबरला आरोग्य शिबिर, महाभोंडला, गरबा डान्स, महिलांची महा रॅली काढण्यात येणार आहे.

यमुनानगर येथील तुळजा भवानीमाता मंदिराच्या सांस्कृतिक महिला मंडळाकडून  विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. दररोज संध्याकाळी सव्वा सात वाजता देवीची आरती होते.  यावेळी यमुनानगर येथील तुळजाभवानी मंदिरात भवानी माता महिला सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकारी रेखा सुर्वे, रेखा कळसकर, संजीवनी कळसकर, प्रभा जोशी, अलका झेंडे, आशा ढवळे, उदय म्हसवडे,  हेमांगी वांजपे, निकिता देशमुख, रेश्मा साळवी, आदी महिला कार्यकरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.