Pune : बीजगोळे निर्मिती उपक्रम रविवारी पुण्यात

एमपीसी न्यूज – "सोसायटी फॉर सायन्स, एन्व्हायर्न्मेंट अँड पीपल" (सेप) आणि "भवताल" मॅगझीन यांच्या वतीने या वर्षीचा पहिला ‘बीजगोळे निर्मिती उपक्रम’ रविवार , (दि .1. एप्रिल ) रोजी इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर येथे संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

बीजगोळा म्हणजे शेण व माती यांचा चिखल करून त्यामध्ये बी टाकायचे आणि त्याचा गोळा करायचा. उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच आधी तयार करण्यात आलेले बीजगोळे भेट देण्यात येणार आहेत. हा उपक्रम सर्व वयोगटातील सगळ्यांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.

बीजगोळे करण्याच्या उपक्रमात जास्तीत जास्त सहभागी होऊन वृक्षसंवर्धनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकुयात असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.