Chikhali News: वंचित आदिवासींची सेवा हीच खरी ईश्वर सेवा – कमला बिष्ट

एमपीसी न्यूज- चिखली – मोशी येथील इनोव्हेटिव वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थी – शिक्षकांनी मावळ येथील करंजगाव आणि राऊतवाडी, करुंज येथील आदिवासी पाड्यावर, कातकरी लोकांबरोबर दीपावली साजरी केली. यावेळी बोलताना संचालिका कमला बिष्ट यांनी आदिवासी पाड्यातील अंधार सारा संपू दे, त्यांच्या घरातील अंधार सारा संपू दे, आकाश तारे उजळू दे, स्पंदनाचा अर्थ येथे एकमेकांना कळू दे, माणसांचा देव होऊ दे, त्यांच्या जीवनात दीपावली रोज यावी अशा भावना व्यक्त केल्या.

चिखली – मोशी येथील इनोव्हेटिव वर्ल्ड स्कूलने शैक्षणिक सेवेच्या व्रताबरोबर समाज सेवेचे व्रत देखील हाती घेतले आहे. संचालिका कमला बिष्ट यांचे म्हणणे आहे की, कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण समाजाचे देणे लागतो गरीब वंचितांची सेवा करणे, त्यांना मदत करणे हे मानव धर्माचे आद्य कर्तव्य आहे आणि हेच देणे विद्यार्थ्यांना शिकविले जाते.

शहरातील मुले सोईसुविधेचा उपभोग घेत असतात, पण त्याच वेळी वंचित आदिवासी भागातील लोकांचे जगणे कसे असते. त्यांच्या सोबत राहून, आनंद त्यांच्या बरोबर वाटून त्यांचा आनंद द्विगुणित कसा होईल याच भावनेने इनोव्हेटिव वर्ल्ड स्कूलच्या वतीने वंचित आदिवासीच्या समवेत दीपावलीचे आयोजन करण्यात आले.

आदिवासी समूहास कौटूंबिक उपयोगी साहित्य, तूप, बासमती तांदूळ, तूरडाळ, दीपावली फराळ, मिठाई, आकाशकंदील, पणत्या, ब्लॅंकेट, स्वेटर आदींचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील त्यांचे शैक्षणिक साहित्य, कपडे, खेळणी आदी आदिवासी मुलांना दिले. त्यांच्या डोळ्यातील भाव पाहून ईश्वर सेवा केल्याचा आनंद आम्हाला प्राप्त झाला असे उद्गार संचालकांनी आणि शिक्षकांनी केले. आदिवासी समूहाने विद्यार्थ्यांच्या सोबत पारंपरिक वाद्य वाजवून – नृत्य करून आनंद साजरा केला.

इनोव्हेटिव वर्ल्ड स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांनी, त्यांना सुविधा नसतानाही ते आनंदाने रहात आहेत. झोपडीवर काट्या कुट्यांचे छप्पर, मोडकळीस आलेल्या भिंती, सारवलेली जमीन, अंगावर तुटपुंजी कपडे, दगड-माती सोबत खेळ असे आदिवासी मुलांचे जीवन. ते बदलण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन त्यांची मदत केली पाहिजे असे आवाहन विद्यार्थीयांनी सर्व समाजाला केले आणि आम्ही प्रत्येक वर्षी आदिवासी भागातील लोकांबरोबर दीपावली साजरी करण्याची इच्छा वक्त केली.

करंजगावचे रवी कुकडे तसेच शाळेचे संचालक, पालक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी आदिवासी पाड्यावरील दीपावलीचा आनंद घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.