Chinchwad News: तब्बल दोन वर्षानंतर मंगेशकर घराण्याचा गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम शुक्रवारी चिंचवडमध्ये!

एमपीसी न्यूज – मंगेशकर घराण्यातील प्रसिद्ध पार्श्वगायिका राधा मंगेशकर यांच्या गीत संगीत मैफिलीचा कार्यक्रम दिवाळी पाडव्यानिमित्त शुक्रवारी (5 नोव्हेंबर) चिंचवड येथे रंगणार आहे.

पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशनच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सकाळी साडेअकरा वाजता होणार असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी आज दिली.

कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर व सर्व प्रकारचे निर्बंध शासनाने खुले केल्यानंतर भारतरत्न ख्यातनाम पार्श्वगायिका लता मंगेशकर यांची भाची राधा मंगेशकर तब्बल दोन वर्षानंतर जाहीर कार्यक्रम घेत आहेत. या आपल्या सुमधुर गीतांची बरसात करण्याबरोबरच संत मीरा यांच्या रचना सादर करणार आहेत. सर्वासाठी विनामूल्य प्रवेश असणार आहे.

शहराच्या सांस्कृतिक वाटचालीमध्ये क्रियाशील असलेल्या मंडळींनी एकत्र येऊन नव्याने स्थापन केलेल्या पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशन या संस्थेचा उदघाटन सोहळा देखील या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, डाॅ अमोल कोल्हे,आमदार लक्ष्मण जगताप,महेश लांडगे, महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, ह.भ.प. पुरुषोत्तमदादा पाटील-आळंदीकर, प्रसिध्द उद्योजक व हाॅटेल कलासागर चे मालक अशोक भोसले,आदी प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. रामचंद्र देखणे असणार आहेत.

फौंडेशनचे सर्व पदाधिकारी विजय बोत्रे पाटील( सचिव) गौरी निलजकर( खजिनदार) व सतीश इंगळे( कार्याध्यक्ष) व अन्य सदस्य यांनी हा विशेष सोहळा व संगीत मैफील आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.