Nigdi News: सफाई व आरोग्य कर्मचार्‍यांना मिठाई वाटप करत उत्तम केंदळे यांनी साजरी केली दिवाळी!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये नगरसेवक उत्तम केंदळे स्पोर्ट्स क्लब व नगरसेवक उत्तम केंदळे युवा मंचच्या वतीने प्रभागातील सर्व साफसफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, स्मशान भूमी मधील कर्मचारी, फवारणी विभागातील कर्मचारी, सुरक्षा रक्षक कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त  मिठाई वाटप करण्यात आले. 

मागील दीड वर्षे हे पूर्ण कोरोना मध्ये गेले.अनेक दुःखद व कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. मागील दिवाळीही साजरी करता आली नाही तर कोरोनामुळे काही आरोग्य व सफाई कर्मचाऱ्यांना घरच्या मुलाबाळांना भेटता आले नाही. परंतु कर्मचाऱ्यांची ड्युटी ही सतत ताणतणाव असली तरी त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. सण-उत्सव प्रसंगी सुट्टी मिळत नाही पण अश्या प्रसंगी सण-आनंदाच्या क्षणी आरोग्य असो की सफाई कामगार असो यांची आठवण समाज ठेवतो, असे प्रतिपादन क्रीडा सभापती उत्तम केंदळे यांनी यावेळी बोलताना केले.

सफाई कर्मचारी हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे .कोरोना काळात एका यौध्दया प्रमाणे आपली जबाबदारी प्रामाणिकपणे बजावली. सफाई कर्मचारी हे स्वतः च्या समस्या बाजूला सारून कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी रस्त्यावर उतरले. आपण सर्व घरात सुरक्षित होतो परंतु आरोग्य कर्मचारी, स्मशानभूमीतील कर्मचारी यांच्या प्रमाणेच सफाई कर्मचारी यांचे कार्य देखील तितकेच गौरवास्पद आह असे गौरवोद्गार यावेळी केंदळे यांनी केले.

सफाई कर्मचारी यांच्याकडे नेहमीच समाजाकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे गेली चार वर्षे झाले नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त मिठाई व फराळाचे वाटप त्यांना करण्यात येते.

यावेळी नारायण पाटील, पिसे काका, महादू आहेर,रमेश औताडे,मनोज जाधव शेखर आसरकर,गिरीश देशमुख,आदित्य कुलकर्णी,कौस्तुभ देशपांडे,श्रीकांत सुतार,प्रशांत बाराथे,सुनील जाधव,उमेश घोडेकर,रुपल माने,संकेत चित्ते,स्वप्नील लोंढे,प्रशांत तरटे,विशाल केंदळे,तुषार चव्हाण,आकाश गाडे,निखिल पवार,राज साळवी,अविष्कार काळे,आदित्य शेळके,प्रशांत केंदळे,धीरज जोशी,कुणाल काळे,अजय शेळके,धनंजय सोनवणे, सोनवणे,ऋषिकेश खटके,संकेत जुनघरे, गौरव यादव,मयूर गोरे,ओंकार काळे,वैभव काळे,चेतन जोशी,वेदांत सिनलकर,विनय शेलार,ओंकार पवार, पिंकू सिंग, सिद्धांत देवकर, गणेश साठे, पंकज कोळी सर्व नगरसेवक उत्तम केंदळे स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.