Bhosari News : उत्तम केंदळे कामाच्या विचाराने झपाटलेला नगरसेवक – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – नगरसेवक ते आतापर्यंत त्यांचे काम उत्कृष्ट आहे. प्रभागातील नागरिकांना ते सातत्याने मदत करत असतात. कामाच्या विचाराने झपाटलेला नगरसेवक अशी उपमाच आमदार महेशदादा लांडगे यांनी क्रीडा सभापती प्राध्यापक उत्तम केंदळे यांना दिली आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त यमुनानगर येथील ठाकरे मैदानावर (दि.13) रोजी भव्य बालजत्रेचे आयोजन प्रा उत्तम केंदळे स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

आमदार लांडगे यावेळी म्हणाले,नगरसेवक ते आतापर्यंत केंदळे यांचे काम उत्कृष्ट आहे. प्रभागातील नागरिकांना ते सातत्याने मदत करत असतात.कामाच्या विचाराने झपाटलेला नगरसेवक असे आपण त्यांना म्हणू शकतो. क्रिडा सभापती पदाची जबाबदारी असतानाही त्यांनी प्रभागात विकास कामे केली आहेत. क्रीडा सभापती म्हणूनही त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत.

खेळाडूंना कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम वर घेणे व त्याला पालिकेच्यावतीने राज्य व देश पातळीवर खेळवणे यामुळे शहराचे नावलौकिक होणार आहे. माझी राजकीय वाटचाल आपल्यासमोर आहे. आपण माझ्यासोबत आहात त्यामुळे मला कसलीही भीती नाही. 2014 नंतर काम करतो त्याच्या मागेच नागरिक जातात. नागरिक कामाला, विकासाला प्राधान्य देतील असे बोलून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत या प्रभाग क्रमांक 13 मधून केंदळे हेच नगरसेवक असतील असा सूचक इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

यावेळी केंदळे यांनी आमदार महेशदादा लांडगे यांचे स्वागत केले. केंदळे म्हणाले, कोरोनामुळे घरात असल्यामुळे मोबाईल मध्ये गुंतलेल्या छोट्या मुलांना खेळण्याची संधी मिळावी या हेतूने आमदार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बालजत्रेचे आयोजन करण्यात आले.भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभागात विकासाला महत्त्व दिले जात आहे.आतापर्यंत भक्ती शक्ती उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावला आहे.स्मशानभूमीसाठी ही 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गोरगरिबांसाठी यमुनानगर रुग्णालय अजून सुसज्ज करण्यात येणार आहे. प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणीसाठी वेळ देऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. क्रीडा सभापतिपदी दुसऱ्यांदा संधी दिल्याबद्दल केंदळे यांनी आमदार महेशदादा लांडगे यांचे आभार मानले व केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

विविध नटांचे आवाज काढणारे राहुल मेहत्रे यांनी यावेळी आलेल्या मुलांचे व नागरिकांचे मनोरंजन केले. प्रभागातील शेकडो छोट्या मोठ्या मुलांनी जम्पिंग जॅक, मिकी माऊस,घोडा गाडी, विविध प्रकारचे पाळणे, हातावर टॅटू काढणे, पाण्याच्या बोटीत बसणे व रेल्वेतून फिरण्याचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी खेळताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

या कार्यक्रमांस भाजपाचे पदाधिकारी दिपक कुलकर्णी,अनिल वाणी, रमाकांत पाटील, चंद्रकांत शेडगे,लक्ष्मण शेळके,धनाजी मोरे, रवींद्र कुकडे,नारायण पाटील, प्रशांत बाराथे , सोमनाथ काळभोर शेखर आसरकर, गिरीष देशमुख,आदित्य कुलकर्णी ज्येष्ठ नागरिक संघाचे गजानन ढमाले,प्रमोद येवलेकर,विनिता श्रीखंडे,बाबासाहेब उत्तेकर,शिवाजी शेळके, सारडा काका, मनोहर चौगुले, सामाजिक कार्यकर्त्या डिगा उदयकुमार, क्रांतीवीर मित्र मंडळाचे श्रीकांत सुतार,लक्ष्मी विर्डिकर,विमल काळभोर,सारिका चव्हाण,जयश्री देशमाने, सुप्रिया परब,सुप्रिया केंदळे, शुभांगी काळवीट ,शीला देशपांडे,नीलिमा गोलार,जयश्री केंदळे,धनश्री घोडके,मुक्ता गोसावी, आदि उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.