Pimpri : ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या महिलेला अटक

45 हजारांची ब्राऊन शुगर जप्त 

एमपीसी न्यूज – ब्राऊन शुगरची विक्री करताना एका महिलेला अटक केली. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी (दि. 13) दुपारी दोनच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्थानकाच्या मागच्या बाजूला केली. महिलेकडून 9.10 ग्रॅम वजनाची  45 हजार रुपयांची ब्राऊन शुगर जप्त करण्यात केली. दरम्यान एक महिला पळून गेली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.

लक्ष्मी उर्फ वैशाली रवी रणदिवे (वय 20 रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलाल्या महिलेचे नाव आहे. तर माया दिलीप रणदिवे ही महिला फरार झाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरात दोन महिला ब्राऊन शुगरची विक्री करत असल्याची माहिती पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून एका महिलेला ताब्यात घेतले. तिची अंगझडती घेतली असता तिच्याकडून 9.10 ग्रॅम वजनाची 45 हजार रुपयांची ब्राऊन शुगर जप्त केली. त्यावरून तीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान तिच्यासोबत असलेली एक महिला पळून गेली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.