Pimpri : नागपंचमीच्या पुजेसाठी मातीचे नाग बाजारात

एमपीसी  न्यूज –  श्रावण महिना हा हिंदू धर्मातील पवित्र महिना समजला जातो. या महिन्यात येणारा नागपंचमी हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमी या सणाला काही भागात जिवंत नागाची अथवा वारूळाची पुजा केली जाते. शहरातदेखील हा सण मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो. त्यामुळे येथील बाजारपेठेत नागपंचमी निमित्त नागाचे प्रतिकात्मक मातीचे पुतळे उपलब्ध झाले आहेत.

श्रावणातल्या प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्व असते. या महिन्यापासून सणांची सुरवात होते. याच महिन्यात नागपंचमी हा सण येतो. त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये नागाची पूजा करणे शक्य नसते. त्यासाठी नागपंचमीच्या सणादिवशी वारुळाची किंवा प्रतिकात्मक मातीच्या नागाची पुजा केली जाते.

ग्रामीण भागात नागपंचमीला वारूळाची पुजा करणे शक्य होते. मात्र शहरी भागात महिलांना नाग आणि वारुळ या दोन्हींची पूजा करणे शक्य नसल्यामुळे या महिला मातीच्या नाग मूर्तीची पूजा करतात.  उद्या दि 15 ऑगस्टला नागपंचमी असल्यामुळे शहरातल्या बाजार पेठांमध्ये नागांच्या विविध आकारातील मातीच्या मूर्ती पूजेसाठी विक्रीस ठेवण्यात आल्याचे चित्र  पहायला मिळाले.  यामध्ये लहान मोठ्या आकारातील 15 ते 30 रुपये किंमतीच्या या मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.