Thergaon : पाणीपुरवठा दोन वेळेस सुरळीत करा

अन्यथा महापालिकेवरती हंडा मोर्चा काढण्याचा योध्दा प्रतिष्ठानचा इशारा

एमपीसी न्यूज – थेरगाव, पडवळनगर  प्रभाग क्रमांक 23मध्ये दोन्ही वेळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. काही ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. या प्रभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत, तरी दोन्हीवेळेस स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी थेरगाव येथील योध्दा प्रतिष्ठानचे  प्रमोद शिंदे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे,  थेरगाव व पडवळ या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वारंवार अधिका-यांना याची कल्पना दिली होती. पण याकडे अधिका-यांनी दुर्लक्ष केले. काही ठिकाणी गढुळ पाणी येत असून काही ठिकाणी पाणी येतच नाही. फक्त एक तास पाणी येत असल्यामुळे प्रभागातील नागरिक त्रस्त आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरले असताना सुध्दा प्रभाग क्रमांक 23मध्ये पडवळनगर, थेरगाव हा परिसर पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. तरी प्रभाग क्रमांक 23मध्ये सकाळी व संध्याकाळी दोन वेळा दोन तास जास्त दाबाने पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अन्यथा महापालितेवर किंवा ग प्रभाग कार्यालयावरती येत्या आठ दिवसांत हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी  योध्दा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल गोरे, उपाध्यक्ष प्रथमेश चक्कर, कार्याध्यक्ष निलेश पोळ आदींच्या सह्या या निवेदनावर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.