Kuruli : कुरुळी गावातून एकाला पन्नास हजार रुपयांच्या गांजा सह अटक

एमपीसी न्यूज- अमली पदार्थ विरोधी पथकाने खेड (Kuruli) तालुक्यातील कुरुळी गावातून एकाला 50 हजार 900 रुपयांच्या गांजा सह अटक केली आहे. ही कारवाई 1 जानेवारी रोजी कुरळी गावात पुणे नाशिक महामार्गावर केली.

याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई कपिलेश कृष्णा इगवे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर दिलीप शामराव जाधव (वय 38 रा.मोशी) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्या आणखी एका महिलेवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे विधानभवन येथे आंदोलन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा 50 हजार 900 (Kuruli )रुपयांचा 59 ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी घेऊन आला होता. यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून 509 ग्रॅम वजनाचा गांजा,1 मोबाईल व रोख 1 हजार 200 रुपये जप्त केले.

त्याने हा गांजा निगडी ओटास्किम येथील एका महिलेकडून आणल्याचे सांगितले आहे. आरोपीवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.