Bhosri : स्कुटीला धक्का लागला म्हणून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – कारचा स्कुटीला धक्का लागला या कारणावरून चौघांनी 24 वर्षीय तरुणाला लाकडी बॅटने व  लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आहे. ही घटना मोशी येथे मंगळवारी (दि.20)सायंकाळी घडली आहे.

Hinjawadi : धारदार शस्त्राने मारहाण करत कामगाराचा खून

याप्रकरणी गणेश अंकुश फुगे (वय 24 रा.मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कल्पक बोराटे (वय 20), सिद्धेश रामाने (वय 20) विनोद बोराटे (वय 45) तन्मय बोराटे सर्व राहणार मोशी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र हे नवीन घेतलेले कपडे बदलून आणण्यासाठी त्यांच्या कारने मोशी कडे जात होते. यावेळी मोशीतील लक्ष्मी रोड येथे स्कुटीला धक्का लागल्याच्या कारणावरून सिद्धेश व कल्पक यांनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यांनी त्यांच्या इतर इतर साथीदारांना बोलवून फिर्यादीला व फिर्यादीच्या मित्राला लाथा बुक्क्यांनी व बॅटने मारहाण केली तसेच लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले.

 

तसेच पोलिसांना सांग नाहीतर कोणालाही सांग तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत धमकी दिली यावरून एमआयडीसी  भोसरी (Bhosri) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.