Hinjawadi : धारदार शस्त्राने मारहाण करत कामगाराचा खून

एमपीसी न्यूज – धारदार शस्त्राने डोक्यावर मारहाण करून कामगाराचा निर्घृण खून केला. बुधवारी (दि. 21) सकाळी दहा वाजताच्या सुमारास बावधन येथे म्हसोबा मंदिराजवळ कामगाराचा मृतदेह आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

Lonavala : चारधाम यात्रेचे आमिष दाखवत लोणावळ्यातील 37 जणांना 10 लाखांचा गंडा

प्रेमबहादूर करण थापा (वय 40, रा. पाटीलनगर, बावधन) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी अंजली प्रेमबहादूर थापा (वय 35, रा. पाटीलनगर, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन रामनदी येथे म्हसोबा मंदिराजवळ इ स्क्वेर इमारतीच्या मागे कंपाउंड लगत निर्जनस्थळी एक मृतदेह असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली.

 

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मृतदेह प्रेमबहादूर थापा याचा असून त्याच्या डोक्यावर गंभीर मारहाण करून खून केल्याचे निष्पन्न झाले. सोमवार (दि. 19) ते मंगळवारी (दि. 21) या दरम्यान घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हिंजवडी  (Hinjawadi ) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.