Wakad : इमारतीवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – इमारतीच्या तिस-या मजल्यावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना आज (गुरुवारी) रहाटणी येथे घडली.

सुदर्शन प्रभाकर क्षीरसागर (वय 30, रा. राजगड कॉलनी, रहाटणी), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन रहाटणी यशवंतनगर येथील राजगड कॉलनीमध्ये राहत होते. त्यांनी राहत्या घराच्या तिस-या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, सुदर्शन इमारतीवर मोबाईलवर बोलत होते. मोबाईलवर बोलताना त्यांचा तोल गेला आणि तिस-या मजल्यावरून ते खाली पडले, अशी तेथील नागरिकांची चर्चा आहे.

दरम्यान, त्यांचा मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.