BNR-HDR-TOP-Mobile

Thergaon: तापकीर चौकातील प्लॅस्टिक पाईपच्या गोदामाला भीषण आग

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – थेरगाव, तापकीर चौकातील प्लॅस्टिकच्या पाईपला आज (बुधवारी) मोठी आग लागली आहे. धुराचे लोटच्या लोट दिसत आहेत. महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

तापकीर चौकात अनुसया मंगल कार्यालयाजवळ प्लॅस्टिकचे पाईपचे गोदाम आहे. या गोदामाला बुधवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशामक दलादह सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मोकळा कचरा पेटवल्याने शेजारीच पाईपच्या गोडाऊनला आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली.

HB_POST_END_FTR-A4

.