Thergaon : व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी आणि ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमी संघ विजयी

एमपीसी न्यूज – थेरगाव येथील महापालिकेच्या (Thergaon) राजीव गांधी क्रीडा संकुलात सुरु असलेल्या 19 वर्षाखालील मुलींच्या वेरॉक वेंगसरकर चषकातील चौथ्या दिवशीच्या साखळी सामन्यांमध्ये व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी आणि ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमी या संघांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीची खेळाडू आचल आगरवाल आणि ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमीची खेळाडू श्रुती पवार या सामना वीरांगना ठरल्या आहेत.

व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी विरुद्ध आर्यन्स क्रिकेट अकॅडमी या सामन्यात वेरॉक वेंगसरकर अकादमीच्या संघाने आर्यन्स क्रिकेट अकॅडमीच्या संघावर 10 विकेट्स राखून सहज विजय मिळवला. आर्यन्स क्रिकेट अकॅडमीच्या संघाने दिलेले 92 धावांचे लक्ष्य वेरॉक वेंगसरकर अकादमीच्या संघाने 20 व्या षटकात सहज पार केले. या सामन्यात चेंडूने 2 विकेट्स आणि बॅट ने 39 धावांची अष्टपैलू कामगिरी करणारी अचल अगरवाल सामना वीरांगना ठरली.

Nigdi : सुमधुर गीतांच्या मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमीने बी अ स्पोर्ट्स अकॅडमीच्या संघावर 9 विकेट्स राखून विजय मिळविला. प्रथम फलंदाजी (Thergaon) करताना बी अ स्पोर्ट्स अकॅडमीचा संघ अवघ्या 54 धावांमध्ये गारद झाला.

प्रत्युत्तरात ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमीने 1 विकेट गमावून 55 धावांचे लक्ष्य 8 षटकांत सहज गाठले. या सामन्यात 2 बळी घेणारी श्रुती पवार सामना वीरांगना ठरली. निहिरा शर्मा हिने नाबाद 27 धावांची खेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.