Vadgaon Maval : शैलेश वहिले यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हरवलेली कागदपत्रे मिळाली परत

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे एमआयडीसी  (Vadgaon Maval) रस्त्याने दुचाकीवरून जात असताना एका व्यक्तीची महत्वाची कागदपत्रे पडली. ही कागदपत्रे वडगाव मावळ येथील रहिवासी शैलेश वहिले यांना सापडली. त्यांनी कागदपत्राच्या मालकाचा शोध घेऊन त्यांना ती कागदपत्रे परत केली. वहिले यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वडगाव मावळ येथील वहिले नगर एमआयडीसी रोड येथे दिवाळीत योगेश दादासाहेब सावंत (राहणार पिंपळे निलख, वाकड रोड) हे गाडीवरून जात असताना त्यांचे आरसी बुक, क्रेडिट कार्ड व सौदी अरेबियाचे कार्ड असे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स रस्त्यात पडले आणि हरवले.

Thergaon : व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी आणि ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमी संघ विजयी

सदरचे पेपर वडगावचे शैलेश वहिले यांना सापडले. शैलेश यांनी  योगेश यांचे आरसी बुकचा फोटो महाराष्ट्र पोलीस शिवलालजी (Vadgaon Maval) दुबे यांना पाठवून व्हाट्सअप वरून त्यांचा नंबर मिळवून घेतला. त्यांना फोन द्वारे संपर्क साधून प्रामाणिकपणाने त्यांचे हरवलेले पेपर, कार्ड, आरसी बुक हे खंडोबा मंदिर येथे बोलवून दिले.

योगेश सावंत यांना कागदपत्रे देताना शैलेश वहिले, नगरसेवक मंगेश खैरे, शिवभक्त तुषार वहिले उपस्थित होते. त्यावेळी सावंत यांनी शैलेश वहिले यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.