Break The Chain : पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊनची ‘ही’ आहे संपूर्ण नियमावली!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी ब्रेक द चेन अंतर्गत नवीन आदेश काल (बुधवारी) रात्री जारी केला. नागरिकांच्या माहितीसाठी आम्ही तो संपूर्ण आदेश या ठिकाणी प्रसिद्ध करीत आहोत. वाचा…. काय आहे लॉकडाऊनची नवी नियमावली.

कोरोना विषाणू (कोविड-१९) संसर्ग साखळी तोडण्यासाठी “Break The Chain” प्रतिबंधात्मक आदेश.

ज्याअर्थी, उपरोक्त संदर्भ क्र. ६ मधील आदेशान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात कोविड — १९ या आजाराच्या प्रसारास प्रतिबंधीत करण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत.
ज्याअर्थी सदर अधिनियमांतर्गत राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कोविड-१९ या संसर्ग रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड-९९ उपाययोजना नियम २०२० अमलात आलेले आहेत. महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अन्वये कोविड-१९ च्या प्रसारास पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकत केलेले आहे.

साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी राजेश पाटील, आयुक्त, पिंपरी चिंचबड महानगरपालिका, पिंपरी चिंचबड महापालिका क्षेत्रामध्ये कोविड-१९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करीत आहे.

१) पिंपरी चिंचबड महानगरपालिका क्षेत्रात कलम १४४ बाबत
अ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात दिनांक १४.०४.२०२१ रात्री ०८.०० पासून ते १ मे २०२१ सकाळी ०७.०० वाजेपर्यंत या कालावधीत कलम १४४ (संचारबंदी) लागू करण्यात येत आहे.
आ) नागरिकांना या आदेशात नमूद केल्याप्रमाणे अत्यावश्यक कामाशिवाय / अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
इ) या आदेशान्वये परवानगी देण्यात आलेल्या आस्थापना / सेवा वगळून सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे सर्व प्रकारचे उपक्रम, सेवा बंद ठेवण्यात येत आहे.

ई) या आदेशामध्ये अत्यावश्यक सेवा ( Essential Category ) म्हणून परवानगी देण्यात आलेले सर्व उपक्रम आणि सेवा या सुरु राहतील.

उ) या आदेशातील मुद्दा क्र.५ अन्वये सुट देण्यात आलेल्या सेवा ( Exemption Category ) हे सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत सुरु राहतील.

ऊ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, जेष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस / नर्स यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०७.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत प्रवास करणेस परवानगी राहील

२) अत्यावश्यक सेवा ( Essential Category ) यामध्ये खालील सेवांचा समावेश असेल

– रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक्स, लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसीज व फार्मासिटीकल कंपनी, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, त्यास सहाय्य करणारे उत्पादन व वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतूक व पुरवठा करणाऱ्या आस्थापना, लस, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय साहित्य व उपकरणे, कच्चा माल उत्पादन व पुरवठा करणारे व त्यांच्याशी निगडीत सर्व सेवा.

– पशु-वैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र , पाळीव प्राणी खाद्याची दुकाने

– किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने (फक्त क्षेत्रिय अधिकारी, पिंपरी चिंचवड मनपा यांनी प्राधिकृत केलेली)

– शीतगृह आणि गोदाम सेवा

– सार्वजनिक वाहतूक – टॅक्सी, रिक्षा, रेल्वे, विमान सेवा

– वेगवेगळ्या देशांचे राजदूत यांची कार्यालये

– पूर्व पावसाळी नियोजित कामे

– पिंपरी चिंचवड मनपाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सार्वजनिक सेवा
–  पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी, ड्रेनेज विषयक तातडीची कामे
– रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि त्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा

– सेबी तसेच सेबीची कार्यालये व त्यांच्याशी संबंधित सेवा देणारी कार्यालये

– दूरसंचार सेवा आणि त्याच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा

– मालवाहतूक

– पाणी पुरवठा सेवा

– कृषी संबंधित सेवा आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बियाणे, खते उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी )

– सर्व प्रकारचे आयात – निर्यात

– ई-कॉमर्स ( अत्यावश्यक सेवेतील वस्तू व सेवांच्या पुरवठ्यासाठी )

– मान्यता प्राप्त मिडिया

– पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने पुरविणाऱ्या सेवा

– सर्व प्रकारच्या कार्गो / कुरियर सेवा

– डेटा सेंटर / क्लाऊड सर्विस प्रोन्हायडर / माहिती व तंत्रज्ञान यांचेशी संबंधित पायाभूत सुविधा आणि सेवा

– शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा

– विद्युत व गॅस वितरण सेवा

– ATMs

– पोस्टलसेवा

– बंदरे व त्यासंबंधित उपक्रम

– कस्टम हाऊस एजंट्स, लस / औषधे / जीवन रक्षक औषधांशी संबंधित वाहतूक करणारी अधिकृत परवाना धारक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर.

– कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल, पॅकेजिंग साहित्याची निर्मिती करणाऱ्या / पुरवठा करणाऱ्या सेवा

– पावसाळ्याच्या हंगामाकरीता नागरीक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणाऱ्या सेवा

–  आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे घोषित केलेल्या अत्यावश्यक सेवा.

– मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने

वरील सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांनी खालील मार्गदर्शक सूचना ( SOP ) यांचे काटेकोरपणे पालन करावे.

> संचारबंदी कालावधीत फक्त नागरिकांना संचार करणेस प्रतिबंध आहे. मात्र वस्तू व सेवा यांचे वाहतुकीवर बंधने नाहीत.

> वरील नमूद वस्तू व सेवा उपक्रमाकरिता सदर कालावधीत करावा लागणारा प्रवास हा १(आ) अन्वये वैध कारण समजण्यात येईल.

> वरील सेवांशी अनुषंगिक उपक्रम हे ‘essential for essential is essential’ या तत्वानुसार अत्यावश्यक सेवा, उपक्रम समजण्यात येईल .

३) अत्यावश्यक सेवा यामध्ये नमूद दुकानांनी खालील मार्गदर्शक सूचना ( SOP) यांचे काटेकोरपणे पालन करावे.

> महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना Covid Appropriate Behavior ( CAB ) चे अत्यावश्यक सेवेतील सर्व आस्थापना, त्यांचे मालक, कर्मचारी तसेच ग्राहकांनी पालन करणे बंधनकारक राहील.

> अत्यावश्यक सेवा / वस्तूंचे दुकानाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करून घेण्यात यावे. सदर आस्थापनांनी कोविड – १९ संदर्भात सुरक्षा उपाययोजना म्हणून पारदर्शक काच अथवा इतर साहित्यांचे कवच तसेच ऑनलाईन पेमेंट इत्यादीद्वारे ग्राहकांशी कमीत कमी संपर्क येईल याप्रमाणे कार्यवाही करावी.

> कोविड प्रतिबंधात्मक नियम / मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचारी / ग्राहक यांचे विरुद्ध प्रत्येकी रक्‍कम रुपये ५००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सदरbनियमांचे उल्लंघन झाल्यास आस्थापनांविरुद्ध रक्‍कम रुपये १०००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच वारंवार नियमांचा भंग झाल्यास सदर आस्थापनाचे परवाना रद्द करणे अथवा मे. केंद्र शासन कोविड-१९ आपत्ती संपूर्णपणे संपली असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील.

> वरील नमूद अत्यावश्यक सेवेतील दुकान / आस्थापना येथील कर्मचाऱ्यांना कामावर जाणे येण्यासाठीचा प्रवास हा १(आ) नुसार वैध कारणासाठी आहे असा समजला जाईल.

> सद्यस्थितीत बंद असलेल्या सर्व दुकानांचे चालक / मालक, तसेच कर्मचारी यांचे लसीकरण भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार करून घेण्यात यावे. सदर आस्थापनांनी भविष्यात दुकाने सुरु करण्याच्या दृष्टीने कोविड – १९ संदर्भात सुरक्षा उपाययोजना म्हणून पारदर्शक काच अथवा इतर साहित्यांचे कवच तसेच ऑनलाईन पेमेंट सुविधा इत्यादीद्वारे ग्राहकांशी कमीत कमी संपर्क येईल याबाबत पूर्वनियोजन करावे.

४) अ) सार्वजनिक वाहतूक – रिक्षा, टॅक्सी / कॅब / चारचाकी स्वयंचलित वाहन खालील मार्गदर्शक सूचना / अटी नुसार सुरु राहतील
>  वाहनाचा प्रकार  – किती व्यक्ती वापरू शकतील
>  रिक्षा –  वाहनचालक + 2 व्यक्ती

>  टॅक्सी / कॅब / चारचाकी स्वयंचलित वाहन – वाहन चालक +  RTOद्वारे निर्गमित केलेल्या आसन क्षमतेच्या ५०% आसन क्षमता

> बस –   RTO द्वारे निर्गमित केलेल्या आसनक्षमतेनुसार प्रवासी संख्या

>  दुचाकी – फक्त वाहनचालक
> नागरिकांनी प्रवास करताना मुखपट्टी ( मास्क ) वापर करणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन झाल्यास रक्‍कम रुपये ५००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

> सर्व प्रकारच्या चारचाकी वाहने, रिक्षा, टॅक्सी, कॅब मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मुखपट्टी ( मास्क ) चा वापर करणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन झाल्यास वाहन चालक आणि प्रवासी यांना प्रत्येकी रक्‍कम रुपये ५००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

> प्रत्येक ट्रीपनंतर वाहन सॅनिटाईज करावेत.

> सर्व सार्वजनिक वाहतूक करणारे वाहन चालक व इतर कर्मचारी यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लसीकरण करून घ्यावे. महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे. वाहन चालक त्यांच्या व प्रवासी यांचेमध्ये प्लास्टिक शीट लावून स्वतःला आयसोलेट करावे.

> वरील नमूद सेवेतील ड्रायवर / कर्मचाऱ्यांना कामावर जाणे येण्यासाठीचा प्रवास हा १(आ) नुसार वैध कारणासाठी आहे असा समजला जाईल.

> रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्यामध्ये उभे प्रवासी असणार नाहीत तसेच सर्व प्रवाशांनी मास्क लावलेले आहेत याची खात्री रेल्वे प्रशासनाने करावी.

> उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध रक्कम रुपये ५००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई
करण्यात येईल.

> सार्वजनिक वाहतूक म्हणून परवानगी देण्यात आलेल्या सेवा सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनुषंगिक सेवा या अत्यावश्यक सेवा संबोधण्यात येत आहेत. (उदा. – handling of Cargo, ticketing at airport etc. )

> रेल्वे, बसेस, विमान सेवा यामधून येणारे अथवा जाणारे प्रवासी यांनी सोबत अधिकृत तिकीट बाळगले असल्यास त्यांना घरापासून स्थानकापर्यंत / स्थानकापासून घरापर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून जाण्यास आठवड्याच्या सर्व दिवस परवानगी राहील.

ब) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (PMPML) बस सेवा अत्यावश्यक सेवा कारणासाठी निर्देशित केलेल्या बस सेवा वगळून संपूर्णत: बंद राहील.

५) सुट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा (Exemption Category)
अ) कार्यालये –
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खालील कार्यालये सुरु राहतील.

> केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था यांची कार्यालये

> सहकारी, सार्वजनिक, खाजगी बँका

> अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची कार्यालये

> विमा / मेडिक्लेम कंपनी

> औषध उत्पादन करणारे आस्थापना व त्यासाठी लागणारे साधन सामग्री उत्पादक तसेच त्याच्याशी संबंधित कार्यालये

>  रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था ( Standalone Primary dealers, CCIL, NPCI, पेमेंट सिस्टिम ऑपरेटर आणि रिझर्व बँकेने नियमित केलेल्या बाजार पेठेतील
कार्यरत वित्तीय बाजारातील सहभागींसह घटक आणि मध्यस्थी )

> सर्व नॉन – बँकिंग वित्तीय महामंडळे

> सर्व मायक्रो फायनान्स संस्था

> वकील, सी.ए यांची कार्यालये, वित्तीय संस्थेशी संबंधित कार्यालये

वरील सर्व कार्यालये जास्तित जास्त ५०% उपस्थितीत सुरु राहतील. (मात्र कोविड – १९ संबंधित कामकाज करणाऱ्या आस्थापना १००% क्षमतेने सुरु ठेवणेबाबत निर्णय संबंधित आस्थापना प्रमुख घेतील.)

वरील नमूद सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर जाणे येण्यासाठीचा प्रवास हा १( आ) नुसार वैध कारणासाठी आहे असा समजला जाईल.

सर्व शासकीय कार्यालयात तसेच शासकीय कंपनी कार्यालयात अभ्यांगतांना कार्यालयात येण्यास संपूर्णतः प्रतिबंध राहील. संबंधित आस्थापना यांनी कार्यालय उपस्थिती अधिकारी / कर्मचारी यांचे व्यतिरिक्त घेण्यात येणाऱ्या सर्व सभा / मिटिंग ऑनलाईन पद्धतीने आयोजित कराव्यात.

सर्व शासकीय व खाजगी कार्यालय प्रमुखांनी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचे लसीकरण भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर करून घेणे अनिवार्य आहे. जेणेकरून कोरोना विषाणूचा प्रसार कमी होऊन कार्यालय पूर्ववत सुरु करता येतील.

६) खाजगी वाहतूक –

> सर्व प्रकारची खाजगी वाहने , खाजगी बसेस या केवळ अत्यावश्यक सेवा, अत्यावश्यक कारण / या आदेशातील १ (आ ) नुसार वैध कारण ( valid reason ) याकरिता सुरु राहील.

> नियमांचे उल्लंघन झाल्यास रक्‍कम रुपये १०००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

> खाजगी बसेस वाहनाच्या आसन क्षमतेनुसार सुरु राहतील. प्रवासी उभे राहून प्रवास करण्यास प्रतिबंध राहील.

> सर्व खाजगी वाहतूक करणारे चालक / मालक व कर्मचारी यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. ज्यांचे लसीकरण झाले नसेल त्या चालक / मालक व कर्मचारी यांनी १५ दिवसांची वैधता असणारा कोविड – १९ निगेटिव्ह (RTPCR/ RAT) सर्टिफिकेट सोबत बाळगणे अनिवार्य आहे.

७) रेस्टोरंट, हॉटेल्स, बार –

> पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट ( हॉटेलमधील / हॉटेल प्रिमायसेस मधील वगळून ) हे बंद राहतील.

> रेस्टॉरंट, हॉटेल्स, बारद्वारे पार्सल सेवा / घरपोच सेवा सकाळी ७.०० ते रात्री ११.०० पर्यंत सुरु राहील. हॉटेलमध्ये जाऊन पार्सल आणण्याची सुविधा असणार नाही.

> हॉटेलमधील रेस्टॉरंट / बार हे रूम सर्विससाठी खुले राहतील. परंतु, बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध राहील. पार्सल सेवा वरीलप्रमाणे देता येईल. हॉटेलमधील अभ्यांगतांना अत्यावश्यक कारण / या आदेशातील १ (आ ) नुसार वैध कारण तसेच या आदेशान्वये परवानगी देण्यात आलेले कार्यालये याकरिताच प्रवास करण्यास परवानगी राहील.
(RTPCR/ RAT)
> घरपोच सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लसीकरण करून घ्यावे. ज्यांचे लसीकरण झाले नसेल त्या कर्मचारी यांनी १५ दिवसांची वैधता असणारा कोविड – १९ निगेटिव्ह  (RTPCR/ RAT) सर्टिफिकेट सोबत बाळगणे अनिवार्य आहे.

> घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोसायटी / बिल्डिंगमध्ये एका पेक्षा जास्त कुटुंबांना पार्सल द्यावयाचे असल्यास सोसायटी / बिल्डींगच्या गेटवर सोसायटी / बिल्डींगच्या कर्मचाऱ्यामार्फत देण्यात यावे. तसेच त्यांनी कोविड संदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

> सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी रक्कम रुपये १०००/- व संबंधित आस्थापनांवर रक्‍कम रुपये १००००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. वारंवार नियमांचा भंग झाल्यास सदर आस्थापनाचे परवाना रद्द करणे अथवा मे. केंद्र शासन कोविड- १९ आपत्ती संपूर्णपणे संपली असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील.

८) उत्पादन क्षेत्र-

याबाबत उद्योग विभागाकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशाचे पालन करावे.

> पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ज्या औद्योगिक कंपन्यांचे शिफ्टमध्ये काम चालते अशा संबंधित आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना ने आण करणारे खाजगी बसेस / खाजगी वाहने यांना संचारबंदीच्या काळात प्रवास करणेस परवानगी राहील. कामगारांनी प्रवास करताना सोबत कार्यालयीन ओळखपत्र बाळगणे अनिवार्य आहे.

9) रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल –

> रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल ( टपऱ्या ) येथे अन्न पदार्थांचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील. फक्त पार्सल घेऊन जाण्यास सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० यावेळेत परवानगी राहील. या कारणाकरिता करावा लागणारा प्रवास हा १ ( आ ) नुसार वैध कारण समजण्यात येईल.

> सदर ठिकाणी नागरिकांनी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे.

> सदर आस्थापनेशी संबंधित कर्मचारी यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करून घ्यावे. अथवा १५ दिवसांची वैधता असणारा कोविड – १९ निगेटीव्ह ( RTPCR / RAT ) दाखला सोबत बाळगणे अनिवार्य आहे.

> महापालिका क्षेत्रिय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी याबाबत काटेकोरपणे नियंत्रण ठेवावे. नियमांचा भंग झाल्यास नागरिक / आस्थापनांविरुद्ध प्रत्येकी रक्‍कम रुपये ५००/- याप्रमाणे दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. तसेच वारंवार उल्लंघन- केल्यास केंद्र शासन कोविड-१९ आपत्ती संपूर्णपणे संपली असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील.

१०) दैनंदिन वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके , नियतकालिके –

> दैनंदिन वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके , नियतकालिके छपाई व वितरीत करणेस परवानगी राहील.

> वर्तमानपत्रांचे फक्त घरोघरी वितरणास सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० पर्यंत परवानगी राहील.

> सदर ठिकाणचे कर्मचारी यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लसीकरण करून घ्यावे. घरोघरी वितरण करणारे कर्मचारी यांनी १५ दिवसांची वैधता असणारे कोविड – १९ निगेटिव्ह ( RTPCR / RAT ) सर्टिफिकेट सोबत बाळगणे अनिवार्य आहे.

११) मनोरंजन ब करमणूक संबंधित – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खालील नमूद आस्थापना संपूर्णतः बंद राहतील.

> सिनेमागृह ( Single Screen and Multiplex) नाट्यगृह, ऑडिटोरियम, मनोरंजन पार्क, अम्यूजर्मेट पार्क / आर्केडूस, व्हिडीओ गेम पार्लर, वॉटरपार्क, स्विमिंगपूल, व्यायामशाळा (जिम) , क्रीडा संकुल (Sports Complex) क्लब इ. आस्थापना संपूर्णत: बंद राहतील.

> सदर आस्थापनातील कर्मचारी यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. > चित्रपट / मालिका / जाहिरातीचे शुटींग बंद राहील.

> सर्व दुकाने, मॉल, शॉपिंग सेन्टर्स (मुद्दा क्र.२ नुसार अत्यावश्यक सेवा वगळून – Essential Services) संपूर्णतः बंद राहतील.
> सर्व सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, मोळ्या जागा, मैदाने इत्यादी संपूर्णत: बंद राहतील.

१२) धार्मिक स्थळे –

> पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील.
> सदर ठिकाणी फक्त दैनंदिन पूजा / अर्चना करणारे कर्मचारी यांना परवानगी राहील.
> सदर ठिकाणचे कर्मचारी यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
१३) स्पा, सलून, ब्युटी पार्लर, केश कर्तनालय –

> पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व स्पा, सलून, ब्युटी पार्लर, केश कर्तनालय संपूर्णतः बंद राहतील.

> सदर ठिकाणचे कर्मचारी यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

१४) पिंपरी चिंचबड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा,महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पूर्णतः बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील.

> इयत्ता १०वी व १२वी ची परीक्षा असल्यामुळे त्यांना यातून वगळण्यात येत आहे.

> परीक्षेशी संबंधित सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लसीकरण केलेले असावे. अथवा ४८ तास वैधता असणारा कोविड – १९ निगेटिव्ह सर्टिफिकेट सोबत बाळगणे अनिवार्य आहे.

> महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बोर्ड / विद्यापीठ / प्राधिकरण यांच्या परीक्षा घेणे अत्यावश्यक असल्यास संबंधित विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संमतीने परवानगी द्यावी.

> पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना / परीक्षार्थींना सर्व प्रकारच्या परीक्षा / स्पर्धा परीक्षेकरिता घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत / परीक्षा केंद्रापासून घरापर्यंत संचारबंदीच्या काळात प्रवास कारणेस परवानगी राहील. परीक्षार्थी सोबत त्यांचे एक पालक यांना देखील प्रवास करणेस परवानगी राहील. मात्र परीक्षार्थींना प्रवास करताना सोबत परीक्षेचे हॉल तिकिट बाळगणे अनिवार्य आहे.

> सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस पूर्णतः बंद राहतील.

> सर्व कर्मचाऱ्यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लसीकरण करून घ्यावे.

१५) सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रम –

अ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रम, सभा संमेलने व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.

आ) लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त २५ लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.

>, मंगल कार्यालयातील सर्व कर्मचारी यांची भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लसीकरण केलेले असावे. अथवा कोविड – १९ निगेटिव्ह दाखला सोबत बाळगणे अनिवार्य आहे.

> सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी रक्‍कम रुपये १०००/- व संबंधित आस्थापनावर रक्‍कम रुपये १००००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

> वारंवार नियमांचा भंग झाल्यास सदर आस्थापनांचे परवाने रद्द करणे अथवा केंद्र शासन कोविड-१९ आपत्ती संपूर्णपणे संपली असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील.

> महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या आदेशातील अटी / मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळी विवाह संबंधित कार्यक्रम २५ लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

इ) अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील. सर्व कर्मचाऱ्यांचे भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण केलेले असावे. अथवा कोविड – १९ निगेटिव्ह दाखला सोबत बाळगणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या आदेशातील अटी / मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळी अंत्यविधीशी संबंधित कार्यक्रम २५ लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

१६) ऑक्सिजन प्रोड्यूसर –

> औद्योगिक कंपन्यांना ऑक्सिजनचा कच्चा माल म्हणून वापर करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. जर एखाद्या कंपनीला या बाबतचा वापर करावयाचा असल्यास त्यांनी योग्य त्या कारणासह लायसनसिंग अँथोरीटी यांची मान्यता घ्यावी. लायसन्सिंग अँथोरीटी यांनी संबंधित कंपन्यांनी सदरची प्रोसेस थांबबावी अथवा रीतसर
परवानगी घेणे बाबत नियंत्रण ठेवावे.

> सर्व ऑक्सिजन प्रोड्यूसर कंपन्यांनी १००% ऑक्सिजनचा पुरवठा हा फक्त वैद्यकीय कारणासाठी करावा. लायसन्सिंग अँथोरीटीने ऑक्सिजनचा वापर करणारे आणि ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्यांची यादी दिनांक १६ एप्रिल २०२१ पर्यंत प्रसिद्ध करावी.

१७) ई-कॉमर्स –

>  ई- कॉमर्स सेवांना फक्त या आदेशातील मुद्दा क्र. २ नुसार घोषित केलेल्या अत्यावश्यक वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.
> सदर आस्थापनेशी संबंधित कर्मचारी यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लसीकरण करून घ्यावे. अथवा कोविड – १९ निगेटिव्ह ( RTPCR/ RAT/ TruNAT/ CBNAAT) दाखला सोबत बाळगणे अनिवार्य आहे. ई – कॉमर्स आस्थापनांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वर्कप्लेस वॅक्सिनेशनकरिता पात्र असल्यास त्यांनी लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करावे. घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याव्यतिरिक्त या अस्थापानावरील कर्मचाऱ्यांनी कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

> घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोसायटी / बिल्डिंगमध्ये एका पेक्षा जास्त कुटुंबाना पार्सल द्यावयाचे असल्यास सोसायटी / बिल्डींगच्या गेटवर सोसायटी / बिल्डींगच्या कर्मचाऱ्यांमार्फत देण्यात यावे. तसेच त्यांनी कोविड संदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

> सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी रक्‍कम रुपये १०००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नियमांचा वारंवार भंग झाल्यास सदर आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात येतील अथवा मे. केंद्र शासन कोविड-१९ आपत्ती संपूर्णपणे संपली असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील.

१८) को-ऑपरेटीव्ह होसिंग सोसायटी –

> को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी मध्ये ५ पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास सदर सोसायटी ही सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून क्षेत्रिय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सनियंत्रण अधिकारी (Incidental Commander) हे घोषित करतील.

> सोसायटी व्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना सोसायटीमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध राहील. यासंबंधित फलक सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सोसायटीमार्फत लावण्यात यावे.

> सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राशी संबंधित सर्व नियमांचे सोसायटीने काटेकोरपणे पालन करावे. तसेच नियमांचे पालन होते किंवा नाही याकडे कटाक्षाने लक्ष ठेवावे.

> सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायटीवर रक्‍कम रुपये १००००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच वारंवार उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

> सोसायटीमध्ये नियमित येणाऱ्या कामगारांची  RTPCR/ RAT/ TruNAT/ CBNAAT   चाचणी करण्यात यावी किंवा भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करून घ्यावे.

१९) पिंपरी चिंचवड महानगरपलिका क्षेत्रामधील ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम सुरु ठेवता येईल. कामगारांनी बांधकामाशी निगडीत साहित्य ने आण करणे करिताच बाहेर पडावे. सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित आस्थापनांवर रक्‍कम रुपये १००००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

> सर्व कामगारांचे भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लसीकरण करून घ्यावे. तोपर्यंत कोविड – १९ निगेटिव्ह ( RTPCR / RAT ) दाखला सोबत बाळगणे अनिवार्य आहे.

> जर एखादा कामगार कोरोना बाधित आढळल्यास त्यांना पगारी वैद्यकीय रजा देण्यात यावी. त्याची सेवा खंडित करण्यात येऊ नये.

> पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांचे साईट ऑफिस / आर्किटेक्चर ऑफिस सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० पर्यंत
सुरु राहतील.

> पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात मेट्रोची कामे सुरु असलेल्या साईट्स सुरु राहतील.

२०) आदेशात नमूद केल्याप्रमाणे अत्यावश्यक काम / या आदेशातील मुद्दा क्र. २ नुसार अत्यावश्यक कारण व मुद्दा क्र. ५ नुसार सूट देण्यात आलेल्या आस्थापना या करिता नागरिकांनी प्रवास करतांना संबंधित ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे.

२१) शनिवार व रविवार साठी इकडील दिनांक ०९.०४.२०२१ रोजीचे आदेश लागू राहतील.

संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील
आदेशापर्यंत लागू राहतील.

कोविड १९ च्या नियंत्रणासाठी वरील उपाय दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८.०० पासून ते दिनांक १ मे रोजी सकाळी ७.०० वाजे पर्यंत लागू राहतील. संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश /मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. केंद्र सरकार/ महाराष्ट्र शासन/ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापूर्वी निर्गमित केलेले
आदेश/मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार / राज्य शासन आणि या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार, अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.
सदर आदेश दि. १४.०४.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.