Pune : यंदा गणरायाचे आगमन भाविकांना करता येणार मेट्रोमधून

एमपीसी न्यूज – पुण्यातील गर्दी व वाहतूक कोंडी लक्षात घेता यंदा पुणेकरांना गणरायाचे आगमन मेट्रोमधून (Pune) करता येणार आहे. प्रथमच अशा स्वरूपात नागरिकाना गणपती बाप्पा मेट्रो मधून नेता येणार आहे. मात्र, हाच आनंद घेताना भविकाना थोडी काळजी घेण्याचे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले असून त्याबाबत नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली पुढील प्रमाणे

हे करा..

1) मेट्रो मधून गणपतीची मूर्ती घेऊन जायची असेल तर ती केवळ 2 फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीची असावी
2) मूर्तीला सुरक्षित व व्यवस्थित झाकून न्या
3) कमी गर्दीच्या वेळेस मूर्ती नेण्यास प्राधान्य द्या
4)स्थानकावर लिफ्टचा वापर करा
5) मेट्रो ट्रेन आणि फलाट यांच्यामधील अंतर लक्ष्यात घ्या आणि पिवळ्या रेषेच्या मागे उभे रहा
6) ढोल ताशे,भोंगे वाजविण्यासाठी असलेल्या निर्बधांचे पालन करा,शांतता राखा
7) आपल्यामुळे इतर प्रवश्याना त्रास होणार नाही याची काळजी घ्या
8) मेट्रो ट्रेन ,स्थानक परिसर स्वच्छ ठेवा
9) एकमेकांची काळजी घेत जाण्या येण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण करू नका

हे करू नका

1) 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंचीची मूर्तीला प्रतिबंध आहे.
2) लाऊड स्पीकर माईक मेगाफोन यासारख्या इलेक्ट्रिकल वस्तूंचा वापर टाळा
3)अनावश्यक गर्दी टाळा
4) गुलाल,फुले,फटाके यासारख्या वस्तूंचा वापर टाळा
5)मेट्रो ट्रेनमध्ये कोणत्याही प्रतिबंधित व ज्वलनशील वस्तुंसह प्रवास करू नका
6) मेट्रो मध्ये पूजा,आरती,जल्लोष टाळा
7) आकर्षक दिवे लाईट चा वापर टाळा
8 ) मेट्रोच्या मालमत्तेचे नुकसान करू नक
9) गणेश मूर्ती कोणी नेत असेल तर त्याच्या जवळ गर्दी करू नका.

याव्यतिरिक्त काही मदत खवी असेल तर मेट्रोच्या 18002705501 या क्रमांकावर संपर्क साधा असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.