Pune Traffic Police : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतूक पोलीस आता रस्त्यावर दंड आकारणार नाहीत, कारण…

एमपीसी न्यूज – पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यापुढे रस्त्यावर उभे असणारे वाहतूक पोलीस आता वाहनचालकांकडून दंड आकारणार नाही. वाहतूक पोलिसांकडून (Pune Traffic Police) मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी मागील काही दिवसांपासून येत होत्या. त्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून वाहतूक पोलीस जरी दंड आकारणार नसले तरी सीसीटीव्हीच्या माध्यमातून मात्र दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांच्या दहशतीखाली असणाऱ्या सामान्य पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पुणे पोलिस आयुक्तांनी या संदर्भात एक पत्रक काढला आहे. पुढील आदेशापर्यंत वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) कोणत्याही स्वरूपाची दंडात्मक रक्कम वसूल करू नये. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंड आकारला जाईल असे पत्रच पुणे पोलीस आयुक्तांनी काढले आहेत.

Combing Operation : कोम्बिग ऑपरेशन दरम्यान पुण्यात सापडली हजारो काडतुसे

पोलीस आयुक्तांच्या या आदेशाने सामान्य पुणेकरांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण मागील काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक पोलिसांकडून सर्वसामान्य माणसाला त्यांची लुबाडणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करण्याऐवजी दंड वसूल करण्याकडेच लक्ष देतात असा देखील एक आरोप लावला जात होता. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.