Talegaon Dabhade News : श्रीगुरु दादा महाराज साखरे यांच्या पुण्यतीथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने श्रीगुरु दादा महाराज साखरे यांच्या 82 व्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

विठ्ठल मंदिरात पहाटे पुजा, अभिषेक, काकडआरती, विष्णूसहस्रनाम, भजन, प्रवचन, हरिपाठ आणि किर्तन आदी कार्यक्रम संपन्न झाले. या काळात ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज दाभाडे, ह.भ.प. सच्चिदानंद महाराज कांबेकर, ह.भ.प. चिदंबरेश्वर महाराज साखरे यांची किर्तनसेवा संपन्न झाली

Pune Traffic Police : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतूक पोलीस आता दंड आकारणार नाहीत, कारण…

संस्थानच्या वतीने येथील भाविक आणि वारकरी साप्रंदायाचे मृदुंगमणी सुभाषराव काशिनाथ बेल्हेकर यांचा श्रीगुरू दादा महाराज साखरे स्मृतीपुरस्कार देऊन विशेष सत्कार डाॅ यशोधन महाराज साखरे यांच्या हस्ते करण्यात आला, तर या संपूर्ण कार्यक्रमाची ज्ञानदानाची सेवा भागीरथीबाई खंडेराव गुंड विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. यावेळी विश्वस्त बाळासाहेब गुंड आणि परिवाराकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज दाभाडे व सर्व सहकाऱ्यांनी केले. या कार्यक्रमास भाविकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. डाॅ. हभप यशोधन महाराज साखरे यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.